Mumbai News : धक्कादायक! मुंबईत पोलिस शिपायाला बॅटने मारहाण
Mumbai News Update : पोलिस शिपायालाच (police constable) बॅटने मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीय. मुंबईतील प्रतीक्षा नगर परिसरात ही घटना घडलीय.

Mumbai News Update : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आलीय. चक्क पोलिस शिपायालाच (police constable) बॅटने मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीय. हरीश उरणकर असे मारहाण झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. नित्यानंद यादव उर्फ नीतू आणि इतर काही गुंडांनी त्यांना मारहाण केलीय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रतीक्षा नगर परिसरात राहणारे हरीश उरणकर हे वरळी पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत आहेत. आज सायंकाळी सहाच्या सुमारास ते राहत असलेल्या प्रतीक्षा नगर परिसरात राहणाऱ्या नित्यानंद यादव उर्फ नीतू आणि इतर काही गुंडांनी अडवून त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर सर्व संशयितांनी त्यांना बॅटने मारहाण केली. हरीश उरणकर हे वरळी पोलिस ठाण्यातून आपल्या घराकडे येत असताना ही घटना घडली आहे. या घटनेनंतर कुटुंबीय व स्थानिक येऊन वाद सोडवला. या घटनेत हरीश उरणकर यांना हाताला आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे उरणकर यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर पोलिस हवालदार उरणकर आणि कुटुंबीयांनी वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाण्यात संबंधित गुंडांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Mumbai News Update : जुन्या वादातून मारहाण
गेल्या काही वर्षांपूर्वी नित्यानंद यादव आणि पोलिस शिपाई हरीश उरणकर यांच्यामध्ये काही कारणाने वाद झाला होता . मात्र, तो वाद पुन्हा यादव याने बाहेर काढत उरणकर यांना आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन उकरणकर यांना मारहाण केली.
दरम्यान, पोलिसालाच मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. भर दुपारी आणि तेही भर रस्त्यात मारहाण करण्यात आलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्ना आता मुंबईतील प्रतिक्षा नगर येथील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. याबरोबरच हरीश उरणकर यांच्या कुटुंबीयांनी मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलीय.
महत्वाच्या बातम्या
























