एक्स्प्लोर

Mumbai Mira Road Crime News : हॉलमध्ये कटर मशीन, बेडरूममध्ये काळं पॉलिथीन; मिरारोडच्या घरात काय पाहिलं? प्रत्यक्षदर्शीचा हादरवणारा अनुभव

Mira Road Crime: मिरारोडच्या घटनेनं संपूर्ण देश हादराला आहे. मिरारोड येथे राहणाऱ्या मनोज साने यानं आपल्या लिव्ह इन पार्टनरची निर्घुण हत्या केली आहे.

Mira Road Crime News: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर अशाच अनेक घटना समोर आल्या. आता अशीच एक घटना मुंबईतील मिरारोड परिसरात उघडकीस आली आहे. ही घटना ऐकल्यानंतर इतकं क्रूर आणि निर्दयी कोणी कसं काय असू शकतं? हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. मिरारोड (Mumbai Mira Road Crime News) येथे राहणाऱ्या मनोज साने यानं आपल्या लिव्ह इन पार्टनरची निर्घुण हत्या केली आहे. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्यानं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कटर मशिनच्या सहाय्यानं तुकडे-तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

आरोपी मनोज सानेच्या शेजारी राहणाऱ्या सोमेश श्रीवास्तव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांसोबत सोमेशही होते. सानेंच्या फ्लॅटमध्ये पोलिसांसोबत सोमेशही गेले होते. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सोमेश यांनी घटनेसंदर्भात काही तपशील सांगितले आहेत. 

सोमेश यांनी सांगितलं की, पोलिसांसोबत ते मनोज साने यांच्या दुर्घंधी येणाऱ्या फ्लॅटमध्ये गेले. घरात जाताच हॉलमध्ये एक वुड कटर मशीन त्यांना दिसली आणि बेडरुममध्ये बेडवर काळ्या रंगाचं प्लास्टिक पसरवलं होतं. तसेच, बेडरुममध्ये महिलेचे केस विखुरलेले होते. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी किचनचा दरवाजा उघडला, तेव्हा पाहिलं की, तिथे ती बादल्या ठेवल्या होत्या. 

ज्यामध्ये मनोज सानेनं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे लहान-लहान तुकडे करुन त्या बादल्यांमध्ये भरुन ठेवले होते आणि रक्तही ठेवलं होतं. बेडरुममध्येही ट्री कटिंग मशीन ठेवली होती. फ्लॅटमध्ये खूपच दुर्गंधी पसरली होती. घरात फ्रीज नव्हता. तसेच, घरात खूप सारे एअर प्रेशनर्स होते. बादलीमध्ये मृतदेहाचे जे काही तुकडे होते. त्यानंतर मात्र आम्हाला पोलिसांनी बाहेर जाण्यास सांगितलं. 

पाहा व्हिडीओ : Meera Road Crime : हॉलमध्ये कटर, काळ्या पिशव्या...मीरा रोड प्रकरणातील Crime Scene Exclusive

लिव्ह-इन पार्टनरला आधी मारलं, मग... 

मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाश दिप बिल्डिंग गीता नगर फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये मागच्या तीन वर्षांपासून एक जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं. त्यात मनोज साने (वय 56) आणि मयत सरस्वती वैद्य (वय 32) हे दोघं राहत होते. त्याच इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येत असल्यानं त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती देऊन तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी दुर्गंधी येणाऱ्या घरात प्रवेश केला. त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं. 

पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नयानगर पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर केला. त्यानंतर सर्वात आधी आरोपीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे केले. कटर मशीनच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपीनं पोलिसांना दिली. त्यानंतर ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केले.  

हत्येसाठी वापरण्यात आलेलं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही हत्या का करण्यात आली याची माहिती चौकशीनंतर समोर येईल. दरम्यान, महिलेचा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेजाऱ्यांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तेव्हा पोलिसांनी हा फ्लॅट उघडला आणि त्यानंतर जे धक्कादायक चित्र समोर आलं ते पाहुन सर्वांनाच धक्का बसला. सध्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget