धक्कादायक! गोवंडीत आढळले एकाच कुटुंबातील चार मृतदेह, पती-पत्नी आणि मुलांचा समावेश
Mumbai Crime News : मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरातील एका घरात चौघांचे मृतदेह आढळलेत. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime News : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरातील एका घरात चौघांचे मृतदेह आढळलेत. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शकील जलील खान ( वय, 34 ), राबिया शकील खान ( 25), सरफराज शकील खान ( 07) आणि अतिफा खान (वय तीन वर्षे) अशी मृतदेह आढळलेल्या चार जाणांची नावे आहेत.
पती शकीलव खान यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला असून इतर तिघांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. पतीने पत्नी आणि मुलांना विष देऊन स्वत: आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
Mumbai | Bodies of four persons of the same family including two children found in a house in the Baiganwadi area of Shivaji Nagar, say police.
— ANI (@ANI) July 29, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही मृतदेह घरातील एका खोलीत आढळून आले. यातील शकील यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. मृतदेह आढळलेल्या खोलीच्या दरवाजाला आतून कडी होती. त्यामुळे ही आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पोलिसांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
एकाच घरातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यूमागचे नक्की कोणते कारण आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळावरून पुरावे शोधण्याचे काम पोलीस करत असून मृतदेह आढलेल्या घराशेजारील लोकांकडे संबंधित कुटुंबाची चौकशी करण्याचे काम सुरू आहे. पोलीस घटनास्थळी उपस्थित असलेल्या संशयास्पद वस्तू ताब्यात घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या