(Source: ECI | ABP NEWS)
Mumbai : नराधमपणाचा कळस! मतिमंद तरुणीवर अनेकांनी केला बलात्कार, अल्पवयीन मुलासह दोघांना अटक, 15 हून अधिकजण संशयित
Mumbai Crime : गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित मतिमंद तरुणीवर अत्याचार सुरू होते. ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मुंबई : एका 20 वर्षीय मतिमंद तरुणीवर अनेकांनी बलात्कार केल्याचं समोर आल्याने दक्षिण मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीला रुग्णालयात भरती करण्यात आलं असता ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर तिच्यावर बलात्कार (Mumbai Rape) झाल्याच उघड झालं. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका 37 वर्षीय इसमाला अटक केली आहे. तर परिसरातील 15 हून अधिक जणांचे डीएनए (DNA) नमुने घेतले असून आता या डीएनए नमुन्यांची जुळवणी केली जाणार असल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वी तरुणीने तिच्या पोटात किडा वळवळत असल्याचं घरच्यांना सांगितलं. काळजीपोटी त्यांनी तिला रुग्णालयात भरती केलं असता तरुणी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. मतिमंद तरुणी गर्भवती राहिल्याचं समजताच रुग्णालयाने तात्काळ पोलिसांना त्याची माहिती दिली.
Mumbai Crime News : बालहक्क सेवाभावी संस्थेची मदत
महिला पोलिसांनी तरुणीला विचारणा केली खरी, मात्र मतिमंद असल्याने तरुणीचा जबाब घेणं, तिच्याकडून माहिती घेणं जवळजवळ अशक्य होतं. अखेर पोलिसांनी बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या एका सेवाभावी संस्थेची मदत घेतली.
Mumbai Girl Rape Case : चौकशीमध्ये अनेकांची नावं समोर
संस्थेच्या स्वयंसेविकांनी त्या तरुणीशी संवाद साधला. संस्थेच्या सेविकांनी तिची एकूण पाच सत्र (सेशन्स) घेतली तिचा विश्वास संपादन केला आणि मग कुठे तिच्याशी संवाद साधनं शक्य झालं. त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी त्या तरुणीवर अत्याचार केला त्यांनी तिला धमकावल्याचंही समोर आलं. त्यामुळे ती तरुणी भेदरलेल्या अवस्थेत होती.
Mumbai Rape case : डीएनए टेस्टच्या आधारे कारवाई होणार
एका सत्रामध्ये ज्या दोघांचं नाव तरुणीने सांगितले त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. ज्यांची नावं तिने मोघमपणे सांगितली त्यांचे पोलिसांनी डीएनए नमुने घेतले असून ते तपासणीसाठी कलिना एफएसएलला पाठवण्यात आले आहेत. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना देखील अटक करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुरवातीला अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(i) आणि 64(2)(k) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
























