एक्स्प्लोर

Mumbai Crime: मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, दादरमधून 10 कोटींचे ड्रग्ज जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर माटुंगा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai: मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने दादर परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 10 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक आरोपी पश्चिम बंगालचा असल्याची माहिती समोर आली आहे. एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता तब्बल 5 किलो एमडी ड्रग्स आढळले. (Mumbai Crime)

माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर माटुंगा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची तस्करी कुठून आणि कुठे केली जात होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

ड्रग माफियांचा सुळसुळाट, चौकशी सुरु

मुंबईसह उपनगरांमध्ये अमली पदार्थांचा वाढता सुळसुळाट रोखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर दादरमध्ये केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी सुरू केली असून, यामागे मोठे ड्रग रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलिसांनी अलीकडच्या काळात ड्रग माफियांविरोधात केलेल्या कारवाया वाढल्या आहेत. या अगोदरही लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र, ड्रग्सचा प्रवाह थांबत नसल्याने पोलिसांनी आता आणखी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी कोणाचे या रॅकेटमध्ये कनेक्शन आहे का, याचा शोध घेतला जात आहे. दोन आरोपींची पोलीस कोठडी मिळवून तपास अधिक वेगाने केला जाणार आहे.

कल्याणमध्ये चुलत भावाची भयंकर पद्धतीनं हत्या

कल्याणधील काटेनमोली परिसरात बुधवारी रात्री एका व्यक्तीचा खून करण्यात आला. येथील नाना पावशे चौकात ही घटना घडली. रंजीत दुबे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रंजीत दुबे (Ranjit Dube) याची त्याचा चुलत भाऊ राम सागर यानेच त्याची हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रंजीत दुबे आणि रामसागर (Ram Sager) यांच्या कुटुंबात गावच्या जमिनीवरुन वाद होता. याच वादातून राम सागर यांनी आपल्या चुलत भावाला निर्घृणपणे संपवले. या घटनेनंतर कोळशेवाडी पोलिसांनी (Kalyan Police) राम सागर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी राम सागर याला बेड्याही ठोकल्या.

हेही वाचा:

Kalyan Crime: कल्याणमध्ये चुलत भावाला भयंकर पद्धतीने संपवलं, आधी गोळी मारली मग डोक्यात आठवेळा चाकू खुपसला, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case Krushna Andhale : तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? CCTV फुटेज समोर, पाहा PHOTOS
तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? CCTV फुटेज समोर, पाहा PHOTOS
लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही, पॉईंटेड उत्तर द्या, रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न, आदिती तटकरे म्हणाल्या....
लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही, रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न,आदिती तटकरे म्हणाल्या....
सरकारी नोकरी हवी असल्यास तमिळ लिहिता, वाचता आलीच पाहिजे; CBSE मध्ये शिकल्याने मातृभाषा शिकलो नाही म्हणणाऱ्या याचिकाकर्त्याला मद्रास हायकोर्टाने फटकारले
सरकारी नोकरी हवी असल्यास तमिळ लिहिता, वाचता आलीच पाहिजे; याचिकाकर्त्याला मद्रास हायकोर्टाने फटकारले
Santosh Deshmukh Case Krushna Andhale : फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये नेमका कुठं दिसला? प्रत्यक्षदर्शांनी सगळंच सांगितलं; म्हणाले, तोंडाला मास्क अन्...
फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये नेमका कुठं दिसला? प्रत्यक्षदर्शांनी सगळंच सांगितलं; म्हणाले, तोंडाला मास्क अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : या देशात हिंदू मुस्लीम दंगली घडवण्याचा काहींचा कट : संजय राऊतKrushna Andhale Seen in Nashik : कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा स्थानिकांचा दावाSatish Bhosale Arrested: Suresh Dhasयांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटकPankaja Munde On Suresh Dhas : पक्षश्रेष्ठींनी आमदार धस यांना समज द्यावी : पंकजा मुंडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case Krushna Andhale : तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? CCTV फुटेज समोर, पाहा PHOTOS
तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? CCTV फुटेज समोर, पाहा PHOTOS
लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही, पॉईंटेड उत्तर द्या, रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न, आदिती तटकरे म्हणाल्या....
लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही, रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न,आदिती तटकरे म्हणाल्या....
सरकारी नोकरी हवी असल्यास तमिळ लिहिता, वाचता आलीच पाहिजे; CBSE मध्ये शिकल्याने मातृभाषा शिकलो नाही म्हणणाऱ्या याचिकाकर्त्याला मद्रास हायकोर्टाने फटकारले
सरकारी नोकरी हवी असल्यास तमिळ लिहिता, वाचता आलीच पाहिजे; याचिकाकर्त्याला मद्रास हायकोर्टाने फटकारले
Santosh Deshmukh Case Krushna Andhale : फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये नेमका कुठं दिसला? प्रत्यक्षदर्शांनी सगळंच सांगितलं; म्हणाले, तोंडाला मास्क अन्...
फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये नेमका कुठं दिसला? प्रत्यक्षदर्शांनी सगळंच सांगितलं; म्हणाले, तोंडाला मास्क अन्...
मोठी बातमी : पंकजा मुंडे पुन्हा म्हणाल्या, सुरेश धस यांना समज द्या, कारणही सांगितलं
मोठी बातमी : पंकजा मुंडे पुन्हा म्हणाल्या, सुरेश धस यांना समज द्या, कारणही सांगितलं
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला  
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला
Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
Embed widget