एक्स्प्लोर

Mumbai Crime : पत्रकारितेच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा नोंद, पोलिस आरोपीच्या शोधात 

शीतपेयात गुंगीचं औषध टाकून लैंगिक अत्याचार केले आणि त्या प्रसंगाचा व्हिडीओ करुन धमकावल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. 

मुंबई: कफ परेड पोलिसांनी 24 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत पांडे असे आरोपीचे नाव असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कफ परेड पोलीस ठाण्यात आयपीसी कलम- 376(2)(n),354(D),323,506,509 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी ही पत्रकारीता कोर्सच्या पहिल्या वर्षात असून मुंबईचा एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

पीडित महिलेने आरोप केला आहे की, आरोपी प्रशांत पांडे यांने तिच्याशी मैत्री करून एका हॉटेलमध्ये नेलं. त्या ठिकाणी तिला दिलेल्या पेयात गुंगी येणारा पदार्थ टाकून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्या घटनेचा अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढला. त्यानंतर तिचा सदरचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना तसेच इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देऊन बऱ्याच वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले.

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तिचा मोबाईल जबरदस्तीने हिसकाऊन घेऊन तो तोडला. तसेच आता तिला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे नसतानादेखील तो फिर्यादी राहत असलेल्या बिल्डिंग खाली आणि ती शिक्षण घेत असलेल्या कॉलेज जवळ येऊन तिचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार विविध मोबाईल फोनवरून कॉल करून मानसिक त्रास देत असल्याचीही तक्रार फिर्यादीने केली आहे. 

तीस रुपयांसाठी मेडिकल कर्मचाऱ्यारा मारहाण

अवघ्या तीस रुपयांसाठी मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याला चार-पाच जणांकडून बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाल्यानंतर चारकोप पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या सर्वांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डहाणूकरवाडी असर मेडिकल शॉपमध्ये एक मुलगा औषध विकत घेण्यासाठी आला. औषध विकत घेतल्यानंतर त्याने गुगल पे द्वारा औषधाचे बिल दुकानदाराला दिले. तीस रुपये जास्त दिल्याचे दुकानदाराच्या लक्षात आणून देत तरुणाने पैशाची मागणी केली. कर्मचाऱ्यांची खात्री झाल्यानंतर त्याने 30 रुपये औषध खरेदी करणाऱ्याला परत केले. मात्र यांच्यात काही बाचाबाची झाली. यानंतर रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास त्या मुलाने त्याचे आई-वडील आणि इतर कुटुंबीयांना सोबत घेऊन येत मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही मारहाण स्पष्टपणे दिसत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAir Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
Embed widget