एक्स्प्लोर

ATM Fraud Mumbai : ओडिशातून मुंबईत विमानाने यायचा, एटीएममधून पैसे काढणाऱ्या वयस्कर नागरिकांना फसवायचा, पोलिसानी मुसक्या आवळल्या

Mumbai Crime : मुंबईत वरिष्ठ नागरिकांची एटीएम कार्ड अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली असून मोठा गुन्हेगारी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मुंबई : शहरात वरिष्ठ नागरिकांना टार्गेट करत एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या आरोपीविरोधात दिंडोशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अनेक एटीएम कार्ड आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. हा आरोपी ओडिशा राज्यातून विमानाने मुंबईत येत असे आणि एटीएम मशीनमध्ये पैसे काढणाऱ्या वयस्कर नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचं कार्ड बदलून फसवणूक करत होता.

ATM Fraud Modus Operandi : फसवणुकीची पद्धत

मालाड पूर्वेतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ नागरिकाला आरोपीने मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदललं आणि सुमारे 40 हजार रुपयांची फसवणूक केली.

Police Investigation : पोलिसांची कारवाई

या घटनेनंतर दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रस्त्यावरील 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. यानंतर नायगाव पूर्व परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली.

Accused Details : आरोपीची माहिती

अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव संभव कुमार कृष्णचंद्र आचार्य (वय 35) असं आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची रोख रक्कम, विविध बँकांचे 25 एटीएम कार्ड आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत.

Mumbai Cyber Crime : आणखी गुन्ह्यांची शक्यता

या आरोपीविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने तो एटीएम कार्ड बदलत असल्याचं उघड झालं आहे.

या प्रकरणात आरोपीचे आणखी साथीदार आहेत का आणि मुंबईत आणखी किती ठिकाणी फसवणूक करण्यात आली आहे, याचा तपास दिंडोशी पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget