(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात दुहेरी हत्याकांड; चोर समजून मारहाण करणाऱ्या 20 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Ambarnath : अंबरनाथ : चोरी करण्यासाठी आलेल्या संशयातून दोन तरुणाची जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघांचा जागेवर मृत्यू झाला. ही घटना अंबरनाथ (Amabarnath) पूर्वेतील दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे घडली आहे.
अंबरनाथ : चोरी करण्यासाठी आलेल्या संशयातून दोन तरुणाची जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघांचा जागेवर मृत्यू झाला. ही घटना अंबरनाथ (Amabarnath) पूर्वेतील दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे घडली आहे. या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर (Shivajinagar) पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या जमावापैकी २० जणांना संशियत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. सूरज परमार आणि सूरज उर्फ भैय्या निर्मल कोरी असं हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.
20 जण पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सूरज परमार आणि सूरज उर्फ भैय्या निर्मल कोरी हे दोघेही अंबरनाथ शहरातील प्रकाश नगर आणि शिवमंदिर परिसरात राहत होते. यापैकी सूरज परमार याच्यांवर चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत दिली. त्यातच अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात एकाच ठिकाणी आज सकाळच्या सुमारास या दोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ह्या दोन्ही तरुणांची चोर समजून जमावाने मारहाण करून हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय त्यादृष्टीने शिवाजी नगर पोलीस तपास करत आतापर्यंत २० जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मृतदेह आढळून आल्याने खळबळ
आज सकाळी शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे हे दोन्ही मृतदेह नागरिकांना दिसून आले. याची माहिती तात्काळ शिवाजी नगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आलंय. दरम्यान घटनास्थळी रक्तस्राव झाल्याचे डाग असून मुक्कामार लागल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.
जमावाकडून चोर समजून मारहाण
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे मृतक दोघेही चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. त्यावेळी परिसरातील कुत्रे त्यांच्यावर अंगावर भुंकत असल्याने परिसरातील नागरिक जागे झाले. तर त्यांना दोघेही परिसरातून पळून जात होते. त्यामुळे जमावाने दोघांना चोर समजून त्यांना मारहाण करत त्यांची हत्या केल्याचा संशय असल्याने पोलीस त्या दिशने तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या