एक्स्प्लोर

Badlapur MNS Leader Accident : भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?

Badlapur MNS Leader Accident : अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून कार चालक फरार असल्याने पोलिस तपास सुरू करत त्याचा शोध सुरू केला आहे.

बदलापूर : बदलापूरमध्ये (Badlapur Accident News) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे (Rajesh Shete) यांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. 7 जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर हा अपघात झाला. या अपघातात शेटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून कार चालक फरार असल्याने पोलिस तपास सुरू करत त्याचा शोध सुरू केला आहे.

Rajesh Shete Accident : नेमकं काय घडलं?

बदलापूर पूर्व येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तथा मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे हे दुचाकीवरून बिलोली परिसरातून आदर्श स्कूलकडे जात होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर उडान पुलावरून आदर्श नगरच्या दिशेने येत असताना एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राजेश शेटे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शेटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. फरार चालकाचा शोध सुरू असून या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात धाव घेतली. राजेश शेटे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, अपघात घडवून फरार झालेल्या चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे बदलापूर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. वाहनाचा क्रमांक आणि चालकाचा माग काढण्यासाठी तपास करण्यात येत असून, लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

Shivsena Shinde :  शिंदे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

श्रीरामपूर येथे शिंदे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. श्रीरामपूरातील गोंधवणी परिसरात रात्री ही घटना घडली आहे. प्रशांत कहाणे नावाच्या युवकावर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रशांत कहाणे शिंदे सेनेच्या युवा विधानसभा संघटक आहेत. चालत्या गाडीवर गोळीबार करतांना नेम चुकल्याने युवकाचे प्राण वाचले. वाळू व्यवसायातील टोळी युद्धातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गोळीबाराच्या घटनेसंदर्भात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणी केमिस्ट्री प्राध्यापकाचा शोध सुरू, लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयचा मुक्काम
नीट पेपरफुटी प्रकरणी केमिस्ट्री प्राध्यापकाचा शोध सुरू, लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयचा मुक्काम
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget