एक्स्प्लोर

एमआयएम जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या; आरोपींना तात्काळ अटक करण्याची जलील यांची मागणी

Crime News : घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने आरिफ यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.तर, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.   

बिहार : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (MIM) पक्षाचे बिहारमधील (Bihar) नेते आरिफ जमाल (वय 40 वर्ष) यांची शनिवारी संध्याकाळी बिहारमधील सिवानमध्ये अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या (Murder) केली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने आरिफ यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. याशिवाय या हत्येमागील कारण काय, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एमआयएमचे नेते आरिफ जमाल हे सिवानचे जिल्हाध्यक्ष होते. तर, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केली.   

आरिफ जमाल यांचे फास्ट फूडचे दुकान आहे. ही घटना रात्री 8.30 ते 9 वाजेच्या सुमारास घडल्याची  सांगितले जात आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. नागरिकांनी तत्काळ जखमी आरिफ यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांकडून उपचार सुरु करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

दुकानात बसले असतांना अचानक गोळीबार झाला...

या प्रकरणी हुसैनगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय यादव यांनी सांगितले की, आरिफ जमाल यांची अज्ञात लोकांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ते दुकानात बसले असतांना अचानक आलेल्या अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. गोळी त्यांच्या पोटात लागली होती. स्थानिक नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आरिफ यांनी लढवली होती विधानसभा निवडणूक...

आरिफ जमाल यांनी यापूर्वी निवडणूक लढवली असल्याचे देखील सांगितले जात आहे. 2015 मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता पक्षाकडून रघुनाथपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी 2022 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूकही लढवली. या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. 

जलील यांचे ट्वीट...

बिहारमधील एमआयएमचे नेते आरिफ जमाल यांच्यावर झालेल्या गोळीबारच्या घटनेनंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत या घटनेचा निषेध केला आहे. जलील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "या हत्येचा तीव्र निषेध करतो. दोषींना तात्काळ अटक करण्याची आमची मागणी आहे,” असे जलील यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Pappu Yerunkar : चुनाभट्टी परिसरात गुंड पप्पू येरुणकरवर गोळीबार, दिवसाढवळ्या 16 राऊंड फायर, एकाचा मृत्यू, चार जखमी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी

व्हिडीओ

NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे
Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
Embed widget