एक्स्प्लोर

विरारमधील सेवन सी रिसॉर्ट भुईसपाट; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच तब्बल 15 तासांहून अधिक सुरु होती तोडक कारवाई

Milind More Virar Seven Sea Resort: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेत अनधिकृत असलेल्या सेवन सी रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Milind More Virar Seven Sea Resort विरार: विरारच्या अर्नाळा येथील सेवन सी रिसॉर्टमधील (Virar Seven Sea Resort) कर्मचारी आणि रिक्षाचालकांच्या मारामारीत ठाण्याचे माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे याचं मारहाणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. हाणामारीची आणि हृदयविकाराचा झटका आल्याची संपूर्ण घटना रिसॉर्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली आहे. या घटनेनंतर सेवन सी रिसॉर्टवर प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली. 

सदर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेत अनधिकृत असलेल्या सेवन सी रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर सेवन सी रिसॉर्टवरती  तोडक कारवाहीचा बडगा उगारला. हे रिसॉर्ट पूर्णपणे  भुईसपाट करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता ही कारवाई सुरु करण्यात आली होती ते मंगळवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. यावेळी पालिकेचे अतिरीक्त आयुक्त आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या इतिहासांत प्रथमच साडे-पंधरा तास प्रशासनाकडून तोडक कारवाई सुरु होती. 

10 अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल-

घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांची पोलीस उपायुक्तांशी फोनद्वारे चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांना फोन करून संबधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत नवीन कायद्या भारतीय दंड संहिता 2023 ते कलम 105, 281, 74, 188(1) (2), 191(2), 118(2),  352, 351 (2) प्रमाणे  अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात अद्याप कुणालाही  अटक करण्यात आली नाही. 

नेमकं काय घडलं?

सेवन सी समोरील रिक्षा बाजूला करण्याच्या कारणावरुन झालेल्या वादावादित ठाण्यातील कुटुंबियांना 10 ते 15 जणांनी बेदम मारहाण केली. यामध्ये महिलांना देखील मारण्यात आले. या घटनेत ठाण्याचे माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचं मारहाणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. तसेच दोघं गंभीर जखमी झाले. 

मिलिंद अचानक कोसळला-

विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील सेवेन सी रिसॉटमध्ये काल रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. रविवारची पिकनिक बनविण्यासाठी मयत मिलिंद मोरे आपल्या कुटुंबातील 15 ते 20 जणांसोबत विरारच्या अर्नाळा सेवन सी रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी आले होते. दिवसभर मज्जा, मस्ती करुन घरी परतत असताना रिसॉटच्या गेटमध्ये एका रिक्षाचा धक्का लागून त्यांची  भांडणं झाली होती. यात मिलिंदला आणि इतर दोघांनाही मारहाण झाली होती. यात बातचीत सुरु असताना मिलिंद अचानक चक्कर येवून कोसळला, त्याला तात्काळ नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. 

संबंधित व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget