चॉकलेटचे आमिष दाखवून 10 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, 42 वर्षीय व्यक्तीला अटक
kalyan crime News : घरात पूजा असून तुला चॉकलेट देतो, तू माझ्या घरात चल असे बोलून शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय नराधमाने 10 वर्षीय अल्पवीयन मुलीवर अत्याचाराचा (Crime News) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

kalyan crime News : घरात पूजा असून तुला चॉकलेट देतो, तू माझ्या घरात चल असे बोलून शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय नराधमाने 10 वर्षीय अल्पवीयन मुलीवर अत्याचाराचा (Crime News) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारधर्माला काळिमा फासणारी ही घटना कल्याण (kalyan) पूर्वेतील हाजीमलंग मार्गावरील एका सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 42 वर्षीय आरोपीवर पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 42 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 10 वर्षीय पीडित अल्पवीयन मुलगी कल्याण पूर्वेतील हाजीमलंग मार्गावरील एका सोसायटीत कुटूंबासह राहून नजीकच्या एका इंग्रजी शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर 42 वर्षीय नराधम हा पीडिता राहत असेलल्या सोसायटीमधील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतो. त्यातच 15 फेब्रुवारी रोजी शाळेला सुट्टी असल्याने पीडित मुलगी आपल्या बहिणी व मैत्रिणी सोबत दुपारच्या सुमारास सोसायटीच्या आवारात खेळत होती. तर नराधम आरोपीच्या घरात त्याच दिवशी पूजा असल्याचे पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केलं.
15 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलीला नराधम शेजाऱ्याने जवळ बोलवले. तसेच तिच्या सोबत खेळणाऱ्या 4 ते 5 मैत्रणीला घरात पूजा ठेवली असून तुम्ही सर्वजण माझ्या घरी पूजेमध्ये या, असे सांगितलं. तर पीडित मुलीला पूजेमध्ये तर तुला चॉकलेट देतो, असे आमिष नराधमाने दाखवून पीडित मुलीला तो त्याच्या घरात घेऊन गेला. घरात सर्व मुलांना जेवण दिल्यानंतर मुलं आपआपल्या घरी गेली असतानाच, पीडित मुलीला नराधमाने बहाण्याने बेडरूममध्ये घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करत पीडितेला कापून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणामुळे पीडित मुलगी भयभीत झाली होती.
दरम्यान, घडलेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी रडत असल्याचे पाहून आईने तिच्याकडे अधिक चौकशी केली. तिने घडलेला प्रकार आईला सांगताच तिला धक्काच बसला. या घटनेनंतर पीडित मुलीला घेऊन पीडितेच्या आईने मानपाडा पोलीस ठाणे गाठून 42 वर्षीय नरधामावर भादंवि कलम 354, 506, सह पोस्को कलम 4, 12 नुसार 16 गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या आधारे आरोपीला अटक केल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास मानपाडा पोलीस पथक करत आहेत.
आणखी वाचा :
पोलीस चौकीसमोरच स्वतःला पेटवून घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू; पुणे शहरातील धक्कादायक घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
