10 रुपयांचा पेन चक्क 95 रुपयांना खरेदी केला; आरोग्य विभागातील घोटाळा समोर, मनाला वाटेल तो भाव
Scam: खर्च झाली आहे. 116 रुपयांना एक चार्ट पेपर खरेदी करण्यात आला आहे ज्यावर 4.25 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झाल्याचा समोर आलय.

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरचा आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोग्य विभागाच्या स्टेशनरी आणि उपकरणांच्या खरेदीत मनमानी किमती लावत खरेदी झाल्याचे उघड झाले आहे. अशा पद्धतीने होणाऱ्या घोटाळ्यामुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागात माजी सीएमओ डॉक्टर आर ए के गौतम यांच्या कार्यकाळात हा घोटाळा झालाय. यानंतर तपासात असे उघड झाले की दहा रुपयांचे पेन 95 रुपयांना खरेदी करण्यात आले होते यात 3.5 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार करण्यात आला. 19 लाख रुपयांचे हॉस्पिटलचे बजेट केवळ पेन्सिल, खोडरबर आणि शार्पनरवर खर्च झाल्याचं समोर आलंय.(Uttar Pradesh) लेखन पॅड आणि फोल्डर खरेदी करण्यासाठी करण्यात आल्याचं समोर आला आहे. मनाला वाटेल तो भाव लावत स्टेशनरी सामानाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Health)
आरोग्य विभागाच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर जिल्हा पंचायत अध्यक्षांना यात आर्थिक अनियमितता आढळून आल्या. आरोग्य विभागाचे डीएम धर्मेंद्र प्रतापसिंह यांच्या सूचनेनुसार स्थापन केलेल्या चार सदस्य पथकाने या तपासात घोटाळ्याचे पुष्टी केली. या चौकशी समितीने घोटाळा केल्याचे मान्य केले नसल्याचे चौकशीत समोर आले. स्टेशनरी साहित्यात मनमानी भाव लावत खरेदी केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
वाट्टेल त्या किमतींनी खरेदी
दहा रुपयांचे पेन 95 रुपयांना खरेदी करत केवळ पेन मध्ये 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार झालाय. तेवढीच रक्कम लेखन पॅड आणि फोल्डर खरेदी करण्यासाठी खर्च झाली आहे. 116 रुपयांना एक चार्ट पेपर खरेदी करण्यात आला आहे ज्यावर 4.25 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झाल्याचा समोर आलय. पेन्सिल खोडरबर आणि शार्पनर खरेदी करण्यासाठी 19 लाख रुपयांचे बजेट वापरण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात डीएम धर्मेंद्र प्रतापसिंह म्हणाले की माझी सीएमच्या कार्यकाळात मनमानी पद्धतीने खरेदी करण्यात आली आहे. यावर पत्र लिहून विलंबन आणि विभागीय कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. शहाजहानपूरच्या आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि अनियमितता उघडकीस आली असून आरोग्य विभागात अशा पद्धतीने सीएमओ डॉक्टर आर के गौतम यांच्या कार्यकाळात हा अपहार झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा:
धक्कादायक! नांदेडमध्ये कार अन् ट्रॅक्टरचा अपघात, कारमालकाने ट्रॅक्टरवरील 5 मजुरांना ठेवलं डांबून























