एक्स्प्लोर

गोवा बनावटीच्या 6 लाख रूपयांच्या विदेशी मद्यासह 51 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोनजण ताब्यात

Maharashtra Sangli Crime News : गोव्याहून पुण्याकडे गोवा बनावटीचे विदेशी मद्य घेऊन येलूर मार्गे कंटेनरमधून वाहतूक करण्यात येणार असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभाग इस्लामपूर यांना मिळाली.

Maharashtra Sangli Crime News : वाळवा तालुक्यातील येलूर नजीक राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर विभागानं कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीची 6 लाख 5 हजार 520 रूपयांचं विदेशी मद्य जप्त केलं आहे. तर इतर मुद्देमाल असा एकूण अंदाजे 51 लाख 7, 780 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सहाचाकी कंटेनर, एक ब्रिझा गाडी आणि कंटेनरमधील इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असून तपास निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी प्रशांत रासकर यांच्या नेतृत्त्वात पुढील तपास सुरु आहे. 

गोव्याहून पुण्याकडे गोवा बनावटीचे विदेशी मद्य घेऊन येलूर मार्गे कंटेनरमधून वाहतूक करण्यात येणार असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभाग इस्लामपूर यांना मिळाली. येलूर येथे सापळा रचून गोवा बनावटीचे विदेशी मद्य, सहा चाकी कंटेनर, एक ब्रिझा गाडी आणि कंटेनरमधील इतर मुद्देमाल असा एकूण 51,07,780 रूपयांचा मुद्देमाल रीतसर कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आला. काल (रविवारी) दुपारी 3.15 वाजता ही कारवाई करण्यात आली. 180 मिलीच्या 3840 बाटल्या आणि मालवहातूक करणारा कंटेनर एमएच 12 क्यूजी 2279 आणि त्यासोबतच पायलेटींग कार ब्रीझा एम.एच 50एल 9970 कार आणि इतर माल जप्त करण्यात आला आहे. 

कारवाई मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई कांतीलाल उमाप, विभागीय  उपायुक्त मा.वाय.एम.पवार यांचे आदेशान्वये अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर निरिक्षक प्रशांत रासकर, उपनिरीक्षक शंकर रनपिसे, उपनिरीक्षक अविनाश घाटगे, साहयक उपनिरीक्षक उदय पुजारी जवान राकेश बनसोडे, संतोष वेदे आणि इतर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Umesh Patil Meets Sharad Pawar : उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?Maharashtra Assembly Election :  27 नोव्हेंबरआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारकVijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलंRahul Narvekar :  निवडणूक किती टप्प्यात घ्यायची हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाचा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
Sharad Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्त्यांसह काही नेते शरद पवारांच्या भेटीला; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मोदीबागेत घडामोडींना वेग
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्त्यांसह काही नेते शरद पवारांच्या भेटीला; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मोदीबागेत घडामोडींना वेग
Maharashtra MLA List : विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?
विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?
solapur: मोहोळमध्ये तुतारीची लॉटरी पंढरपूरच्या राजू खरेंना लागणार, शरद पवार यांच्याकडून जातीय समीकरणाची गोळाबेरीज 
मोहोळमध्ये तुतारीची लॉटरी पंढरपूरच्या राजू खरेंना लागणार, शरद पवार यांच्याकडून जातीय समीकरणाची गोळाबेरीज 
Sanjay Raut : विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक मतदारसंघात 15 कोटी पोहोचले!
विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक मतदारसंघात 15 कोटी पोहोचले!
Embed widget