सिगरेट आणण्यासाठी वेळ लागल्याने मित्राची हत्या, हत्येनंतर तुकडे करून बोअरवेलमध्ये टाकले
सिगरेट आणण्यासाठी वेळ लागल्याने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीतील मिरज येथे घडली आहे.

सांगली : सांगलीतील मिरज तालुक्यातील भोसेमध्ये मित्राचा खून करून तुकडे कूपनलिकेत टाकत क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली आहे. मद्यपान करत असताना केवळ सिगारेट आणण्यासाठी वेळ लागल्याने ही हत्याची घटना घडलीय. दत्तात्रय शामराव झांबरे(वय 24) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. दत्तात्रयच्या खूनप्रकरणी अमोल ऊर्फ धर्मराज आनंदा खामकर (27) आणि सागर सुरेश सावंत (25) या दोघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
संतापलेल्या दोन्ही आरोपींनी त्याच्या अंगावर कोयता घेऊन त्याच्यावर सपासप वार करून डोक्यात दगड घालून खून करून त्याच्या शरीराचे तुकडे केले. 28 जुलैपासून बेपत्ता असलेल्या दत्तात्रयच्या मृतदेहाचे तुकडे करून कूपनलिकेच्या पाईपमध्ये टाकल्याची आरोपींनी कबुली दिलीय. पार्टी सुरू असताना दत्तात्रय झांबरे यांना आरोपींनी सिगारेट आणायला पाठवले. सिगरेट आणण्यासाठी वेळ लागल्याने संतापलेल्या दोन्ही आरोपींनी त्याच्या अंगावर कोयता घेऊन त्याच्यावर सपासप वार करून डोक्यात दगड घालून खून करून त्याच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर मृतदेहची तुकडे कुपनलिकेत टाकले.
28 जुलै रोजी दत्तात्रय झांबरे हा युवक गावातून गायब होता. त्याचा शोध घेऊन 29 जुलै रोजी त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता असल्याचे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होते. अमोल खामकर, सागर सावंत हे दत्ताचे चांगले मित्र होते. 28 जुलै रोजी हे तिघेही एकत्र असताना त्या दिवशी पासून दत्ता गायब होता. एरवी दत्ता हा गाव सोडून गावाबाहेर जात नसे. त्याच्या घरच्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली असता आणि चौकशी केली असता घातपात झाला असावा असा संशय व्यक्त केला होता. पोलिसांना तपासादरम्यान खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता दत्ताचा त्याच्याच जवळच्याच मित्राने त्याचा घातपात केल्याचे निष्पन्न झाले आहे.
28 जुलै रोजी अमोल खामकर आणि सागर सावंत या दोघांनीच दत्ता झांबरेचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दारू पिल्यानंतर सिगारेट आणायला उशीर झाला आणि यात शिवीगाळ झाली आणि यातून खून केल्याचं निष्पन्न झाले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे दोघांना अटक केली असून दोघांनी खून केल्याची कबुली दिली आहे. भोसे येथील बंद अवस्थेत असलेल्या एक पडक्या कंपनीमध्ये निर्जनस्थळी दत्ताला मारून टाकल्याचे तपासात समोर आले आहे. खून केल्यानंतर त्याचा मृतदेहचे तुकडे करून कुपणालिकेत टाकल्याचे दोघांनी कबुली दिली आहे.मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या :
























