Pune Crime news : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 11 लाख रुपयांचे "म्याव म्याव" जप्त
Pune Crime news : पुण्यात 11 लाख रुपयांचे "म्याव म्याव" (Mephedrone Drugs) जप्त करण्यात आलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.
Pune Crime news : पुण्यात (Pune)11 लाख रुपयांचे "म्याव म्याव" (Mephedrone Drugs) जप्त करण्यात आलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांची (Crime) करडी नजर आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी शहरात चांगलीच तयारी सुरु आहे. त्यामुळे शहरात अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. त्यासोबतच काही विशेष पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्या मदतीने म्याव म्याव मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने कारवाई केली आहे. हा आरोपी येरवडा परिसरात राहतो. त्याच्याकडून 11 लाख रुपयांचे 53.08 ग्रॅम "एम डी" (मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. स्टेशन परिसरातून एका तस्कराला 11 लाख रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ औषधी कॅप्सुलच्या स्वरुपात येतं. तसेच तरुणाईमध्ये या अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळते आहे. पार्टीमध्ये या अंमली पदार्थाचे सेवन केलं जातं.
नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची करडी नजर
31 डिसेंबरला दोन दिवस बाकी आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस लक्ष ठेवत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
यापूर्वी 12 लाख रुपयांचे अमली पदार्थ केले होते जप्त
पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून म्याव म्याव ड्रग्ज म्हणजेच एमडी जप्त करण्यात आलं होतं. दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई करण्यात आली होती. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 12 लाख रुपये एवढी होती. पोलिसांनी या कारवाईत अंमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली. महंमद फारुख महंमद उमर टाक असं अटक केलेल्या तस्कराचं नाव असून तो मूळचा राजस्थानचा होता. पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकात एक इसम येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटने सापळा रचला. पाठीला सॅक लावलेला एक तरुण फूटपाथवर संशयास्पद रेंगाळताना दिसला. साध्या वेशातील पोलिसांनी महंमद टाक याला ताब्यात घेतलं होतं.