एक्स्प्लोर

राज्यात सायबर फ्रॉडमुळे 7,634 कोटींचे नुकसान, ज्येष्ठ नागरिकांनी काय करावं? सायबर पोलिसांनी सांगितल्या उपाययोजना 

Cyber Crime : देशभरात 12 लाखांपेक्षा जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 11,333 कोटी रुपयाच्या नुकसानाची नोंद आहे.

मुंबई : राज्यातील सायबर फसवणुकीच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत असून 2024 मध्ये 8,947 प्रकरणं घडली. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे 7,634 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेल आणि जेन्स लाईफ यांनी संयुक्तपणे एक व्हिडीओ मालिका तयार केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सायबर सेलचे पोलिस महाउपनिरीक्षक संजय शिंत्रे यांनी संवाद साधला आहे. 

महाराष्ट्र सायबरने नमूद केले आहे की, सायबर गुन्ह्यांच्या दररोज 5000 तक्रारी नोंदल्या जातात. याचा अर्थ दर मिनिटाला 4 सायबर गुन्हे घडत आहेत. सध्या सगळ्यात जास्त आढळणारा घोटाळा म्हणजे ‘डिजिटल अरेस्ट’, ज्यामध्ये गुन्हेगार स्वतः कायदा अंमलबजावणी अधिकारी असल्याचे सांगून आणि कायदेशीर कार्यवाहीच्या धमक्या देऊन वृद्धांकडून पैसे उकळतात.

काय सांगतेय आकडेवारी? 

- देशभरात 12 लाखांपेक्षा जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 11,333 कोटी रुपयाच्या नुकसानाची नोंद आहे.
- 2024 मध्ये, फक्त महाराष्ट्रात 8,947 सायबर प्रकरणे नोंदण्यात आली आहेत. यावरून डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांचे वाढते प्रमाण दिसून येते.
- पुण्यात सर्वाधिक आर्थिक नुकसान रु. 6,707 कोटी रु. झाल्याची नोंद आहे.
- नागपुरात 63.85 कोटी रु. च्या फसवणुकीची 212 प्रकरणे आहेत.
- मुंबईत सर्वाधिक 4849 प्रकरणे नोंदण्यात आली आहेत.

महाराष्ट्र सायबरचे पोलीस महाउपनिरीक्षकसंजय शिंत्रे यांनी ज्येष्ठ नागरिक कसे फसवणुकीला सहज बळी पडू शकतात यावर प्रकाश टाकताना म्हटले, “भारतात 15 कोटींपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे डिजिटल ज्ञान मर्यादित असते आणि आर्थिक संपत्तीपर्यंत पोहोच असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना सायबर गुन्ह्यांसाठी प्रामुख्याने लक्ष्य बनवले जाते. डिजिटल अरेस्टच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोणतेही सरकारी खाते किंवा पोलीस, विमानतळ, कस्टम्स, इन्कम टॅक्स, CBI, क्राइम ब्रांच, CID, ED सारख्या कायदा अंमलबजावणी एजन्सी कधीही व्हिडिओ कॉल मार्फत चौकशी करत नाहीत.”

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या सक्रिय उपाययोजनांवर भर देत संजय शिंत्रे म्हणाले की, “या वाढत चाललेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खास सायबर गुन्हे हाताळणारी केंद्रे स्थापित केली आहेत. ही भारतातील एक अशी व्यवस्था आहे, जेथे गुन्ह्याला बळी पडणारा माणूस आमच्या हेल्पलाइन नंबरमार्फत 24 तासात केव्हाही गुन्हा नोंदवू शकतो. या वाढत्या घोटाळ्यांविषयीचे मार्गदर्शन सतत प्रकाशित करून आम्ही नागरिकांना सतर्क राहण्याची विनंती करत आहोत. आम्ही एक समर्पित प्लॅटफॉर्म विकसित केला आहे, जेथे बळी पडलेली व्यक्ती तक्रार नोंदवून तत्काळ तपास सुरू करवू शकते.” ते पुढे म्हणाले, “जेव्हा जेव्हा पेमेंट करण्याची डेडलाइन दिली जाते तेव्हा नेहमीच तो सायबर गुन्हा असू शकतो, हे ध्यानात ठेवा.”

या गुन्ह्यांचा सामना करताना काय करावे याबद्दल सल्ला देताना संजय शिंत्रे म्हणाले, “सायबर गुन्हेगार सतत आपल्या पद्धती बदलत आहेत. त्यामुळे जागरूकता ही बचावाची पहिली पायरी आहे. भारत सरकारने 26 लाखांपेक्षा जास्त बनावट मोबाइल नंबर ब्लॉक केले आहेत, जे सायबर गुन्ह्याविरुद्धच्या लढ्यातील एक लक्षणीय पाऊल आहे. ज्येष्ठ नागरिकांना अधिकृत मार्गदर्शिकांची माहिती असली पाहिजे, त्यांनी आपले मोबाइल सुरक्षित ठेवून डिजिटल स्वच्छता राखली पाहजे आणि अज्ञात कॉल आणि मेसेज नेहमी तपासून घेतले पाहिजेत. काहीही संशयास्पद वाटल्यास कुटुंबातील एखाद्या विश्वासू माणसाशी बोलावे किंवा आमच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. आपण एकत्र मिळून या धोक्यांवर मात करू शकतो.”

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Crime News: फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गंडा, उच्चशिक्षिताने संपवलं जीवन
फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गंडा, उच्चशिक्षिताने संपवलं जीवन
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Pimpri Chinchwad Crime : आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ
आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
LPG Gas Shortage Maharashtra: गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
Embed widget