एक्स्प्लोर

Crime News: ती खूपच खर्च करायची... त्रासलेल्या पतीनं गर्भवती बायकोची सुपारी दिली, पत्नीला यमसदनी धाडलं, नेमकं काय घडलं?

Crime News: पतीने आपल्याच पत्नीची सुपारी देऊन हत्या केली. पत्नीचे शौक आणि सतत खर्च करण्याच्या सवयीला कंटाळून नवऱ्यानेच ओळखीतील एकाला सुपारी देऊन तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.

मध्यप्रदेश: एक पती आपल्या पत्नीसाठी कुटुंबासाठी कष्ट करतो, राबतो सर्व काही त्यांच्यासाठी करतो असं म्हणतात, मात्र, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका पतीने आपल्याच पत्नीची सुपारी देऊन हत्या (MP Crime News) केली. पत्नीचे शौक आणि सतत खर्च करण्याच्या सवयीला कंटाळून नवऱ्यानेच ओळखीतील एकाला सुपारी देऊन तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. या हत्येत तरुणाच्या मित्रानेही त्याला साथ दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचा खून  (MP Crime News) करून घेण्यासाठी पतीने अडीच लाख रुपयांची सुपारी ठरवली आणि डोळ्यासमोरच मित्राने पत्नीची हत्या केली.

जास्त पैसे खर्च करत असल्याने पती नाराज होता

रिपोर्टनुसार, मृत महिला खूप पैसे खर्च करायची आणि हीच गोष्ट तिच्या पतीला नाराज करणारी होती. ग्वाल्हेरमध्ये 13 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली होती, जी आता 11 दिवसांनंतर पोलिसांनी उघड केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी विकी फॅक्टरीजवळ एक भीषण अपघात झाला होता. लोडिंग वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरून जात असलेल्या दुर्गावती या महिलेचा मृत्यू झाला, तर मोटारसायकल चालवत असलेला दुर्गावतीचा भाऊ संदेश हा जखमी झाला. दुर्गावती यांचे पती अजय भार्गव यांनीही पोलिसांना याबाबत तक्रार दिली होती. 

हे सर्वजण मंदिरात दर्शन करून परतत असताना लोडिंग वाहनाच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्याचे अजयने पोलिसांना सांगितले होते. त्यावेळी पोलिसांनीही हा अपघात समजून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी अपघात स्थळाभोवती बसवलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली, त्यानंतर फुटेजमध्ये कोणतेही लोडिंग वाहन दिसत नव्हते. मात्र, संदेश आणि दुर्गावती ज्या मोटारसायकलवर स्वार होते, त्याच्या मागे इको स्पोर्ट कार नक्कीच दिसत होती. यानंतर पोलिसांना संशय आला.

पोलिसांकडून पतीची चौकशी

पोलिसांनी अजयची चौकशी केली असताहे लोडिंग वाहन आहे की धडक देणारी कार? यावर अजय म्हणाला की ही कार देखील असू शकते. येथून अजयवरील पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. यानंतर पोलिसांनी अजयचा तपास सुरू केला.मृत दुर्गावती ही अजयची दुसरी पत्नी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अजयची पहिली पत्नी बागचिनी, मुरैना येथे अजयच्या वडिलोपार्जित घरात राहते, तर अजयने दुर्गावती उर्फ ​​मुस्कानसोबत दुसरे लग्न केले होते. अजयचे दुर्गावतीसोबतही प्रेमसंबंध होते. 2017 मध्ये अजय आणि दुर्गावती दोघेही परीक्षेच्या तयारीदरम्यान एकमेकांच्या संपर्कात आले. पण 2021 साली दुर्गावतीच्या वडिलांनी दुर्गावतीचं लग्न दुसरीकडे लावलं.

पतीने रस्ता अपघाताचा कट रचला

अजयचेही 2022 साली लग्न झाले. दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले, पण अजयच्या लग्नानंतर काही दिवसांनी दुर्गावतीने आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि ती आपल्या घरी परतली. पुन्हा एकदा दुर्गावती आणि अजय एकमेकांच्या संपर्कात आले. अजय आणि दुर्गावती यांनी 2023 मध्ये कोर्टात लग्न केले. यानंतर दोघेही पडाव परिसरातील साकेत नगर येथे राहू लागले. 

पतीने रस्ता अपघाताचा कट रचला

या घटनेबाबत माहिती देताना अतिरिक्त एसपी निरंजन शर्मा यांनी सांगितले की, अजय भार्गवला त्याची दुसरी पत्नी दुर्गावतीच्या खर्चाची खूप काळजी होती. दुर्गावती इतके पैसे खर्च करायची की अजयची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली. त्यालाही दुर्गावतीचा राग येऊ लागला, म्हणून अजयने दुर्गावतीला यमसदनी पाठवण्याचा निर्णय घेतला.

अडीच लाखात खुनाची सुपारी

यासाठी त्याने त्याच्या तीन मित्रांचीही मदत घेतली. अजयने त्याच्या मित्राला इंदूरहून ग्वाल्हेरला इको स्पोर्ट कारने बोलावले. ठरवल्याप्रमाणे, अडीच लाख रुपयांमध्ये अजयने त्याच्या मित्राला पत्नीचा खून  (MP Crime News) करण्याची सुपारी दिली. पूर्ण नियोजनानुसार अजय पत्नी आणि मेव्हण्यासोबत मंदिरात दर्शनासाठी गेला होता आणि परतत असताना अजयने इशारा करताच दुचाकीला कार धडकवण्यात आली, यात दुर्गावती खाली पडल्याने कारने तिला चिरडले. यात तिचा मृत्यू झाला. यासाठी अजयने त्याच्या मित्राला अडीच लाख रुपयांची सुपारी दिली, मात्र पोलिसांच्या तपासात त्याच्या सर्व बाबी उघड झाल्या आणि तो पकडला गेला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget