Pune News : लोणावळा लायन्स पॉइंटजवळ टोकाचे पाऊल घेण्यासाठी उभा, लोकांकडून विनवणी...अंधार पडला अन्....
Lonavala Crime News : सायंकाळच्या पाच सहाच्या दरम्यान या भागात धुके वाढले, अंधार पडू लागला. त्यानंतर त्या ठिकाणाहून तो व्यक्ती दिसेनासा झाला. मात्र नंतर शोधकार्य सुरू केले मात्र तो सापडला नाही.
लोणावळा, पुणे : पर्यटन स्थळी लोकांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीचे मन वळवण्याचे प्रयत्न स्थानिकांकडून आणि बचाव पथकाकडून करण्यात आले. मात्र, सायंकाळी पडलेल्या धुक्यात आणि नंतर रात्रीच्या अंधारात हरवलेल्या व्यक्तीचा थेट मृतदेहच हाती लागल्याची घटना लोणावळ्यात घडली आहे.
लोणावळा (Lonavala) येथील लायन्स पॉइंट (Lions Point) येथे एक व्यक्ती डोंगराच्या कडेला उभा राहिला होता. त्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या माणसाच्या तोंडून सतत मी आत्महत्या करणार आत्महत्या करणार बोलत होता. मात्र त्यावेळी जवळ असलेल्या नागरिकांनी त्याला असे करू नको म्हणत होते. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर रिस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल झाली. त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळच्या पाच सहाच्या दरम्यान या भागात धुके वाढले, अंधार पडू लागला. त्यानंतर त्या ठिकाणाहून तो व्यक्ती दिसेनासा झाला. मात्र नंतर शोधकार्य सुरू केले मात्र तो सापडला नाही.
बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे 25 सप्टेंबरपासून त्याचे शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र त्याचा मृतदेह आता राजगड हद्दीत सापडला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संतोष शिळावणे वय अंदाजे 42 वर्ष असून तो लोणावळा परिसरातील रामनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे अद्याप समोर आलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणावळा परिसरातील लायन्स पॉइंट येथे एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी कठड्यावर उभा होता. त्यावेळी पोलिसांनी रेक्स्यू टीमच्या मदतीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळाने या भागात धुके आणि अंधार पडला. त्यानंतर तो व्यक्ती दिसेनासा झाला. त्यानंतर रेस्कयु टीमने त्या दिवशी शोधकार्य सुरू केले होते. मात्र तो सापडला नाही. मात्र त्यानंतर शोध घेत असताना त्याच्या शरीराचे वेगवेगळे भाग म्हणजे सुरुवातीला हाताचा पंजा आणि पाय सापडले, त्यानंतर संपूर्ण शरीर हे म्हणजेच मृतदेह रायगड जिल्ह्याच्या हद्दीत सापडला आहे.
याबाबत लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले की, लोणावळा ग्रामीण पोलिसात हरवला असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार संबधित व्यक्तीचा मृतदेह सापडला असून तो अद्याप रायगड पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.