एक्स्प्लोर

Laapataa Ladies : राज्यात 'लापता लेडीज'ची संख्या एक लाखांवर, कुठेही ठावठिकाणा नाही, पोलिस यंत्रणेत उदासिनता

Women Missing In Maharashtra : गायब करण्यात आलेल्या महिलांकडून अनैतिक कामं, मानवी तस्करी आणि दहशतवादासारखी कामं करून घेत जात असल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. 

मुंबई: एका धक्कादायक आकडेवारीनुसार, साल 2018 ते 2022 या पाच वर्षांत महाराष्ट्रातून 1 लाखांपेक्षा जास्त महिला बेपत्ता झाल्या आहेत, ज्यांचा आजवर काहीच ठावठिकाणा नाही. या आकडेवारीनुसार पुरोगामी महाराष्ट्रात महिला सुरक्षिततेचा मुद्दा किता गंभीर आहे याची कल्पना येते. कारण हरवलेल्या लोकांना शोधून काढण्यात आणि त्यांचे संरक्षण करण्यात प्रशासकीय यंत्रणांमध्ये एक तर नियोजना अभाव आहे किंवा या मुद्यावरून उदासिनता आहे. पाहुयात यासंदर्भात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

वर्षा आव्हाड या विशेष मुलांच्या खास शाळेत गेली तीन दशकं कार्यरत आहेत. वर्षा यांची 30 वर्षीय मुलगी गौरी गेल्या 9 महिन्यांपासून कुर्ला नेहरूनगर परिसरातून गायब झाली आहे. विधी शाखेची एक गुणवंत विद्यार्थीनी सकाळी वॉकला घराबाहेर पडली ती आजवर परत आलीच नाही. आपल्या मुलीच्या शोधासाठी वर्षा आव्हाड देशभरात शोध घेत हिंडतायत. घरातून बाहेर पडल्यावर त्यांची नजर हल्ली फक्त आपल्या मुलीच्याच शोधात असते.

नेहरू नगर पोलिस ठाण्यात जाऊन जेव्हा एबीपी माझानं या केसचा पाठपुरावा केला, तेव्हा पोलिसांनी याप्रकरणाचा नियमित शोध सुरू असल्याची माहिती दिली. मात्र तांत्रिकदृष्ट्या गौरीचा काहीच मागमूस लागत नसल्याची त्यांनी खासगीत कबुली दिली.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीनुसार, महिलां आणि मुलीं बेपत्ता होण्याच्याबाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या पाच राज्यांत येत.

एनसीआरबीनं जारी केलेली महाराष्ट्रातील आकडेवारी

साल अल्पवयीन मुली महिला एकूण बेपत्ता
2018 2,063 27,177 29,240
2019 2,323 28,646 30,969
2020 1,422 21,735 23,157
2021 1,158 19,445 20,630
2022 1,493 22,029 23,522

मानवी तस्करी, अनैतिक धंदे आणि दहशतवादासाठी वापर

मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात एका माजी सैनिकाकडून जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. देशभरातून गायब झालेल्या या महिलांचा मानवी तस्करी, अनैतिक धंदे आणि प्रसंगी दहशतवादी कारवायांसाठीही वापर होत असल्याच्या घटना समोर आल्यात. त्यामुळे राज्य सरकारला या गंभीर विषयावर तितक्याच गंभीरतेनं पाहण्याची आणि बेपत्ता महिलांना शोधण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याची विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे.

पोलिस विभागाने अधिक दक्ष होणं अपेक्षित

या केसेसमध्ये बऱ्याचदा महिलांना परराज्यात किंवा थेट परदेशात नेलं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे केंद्रीय गृह विभागानं यात अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण हतबल झालेले कुटुंबीय आधी पोलिस, मग महिला आयोग, मग मानवाधिकार आयोगात चकरा मारत बसतात. पण बऱ्याचदा त्यांच्या पदरी पडते ती केवळ निराशा. 

लाखोंच्या घरात असलेली ही प्रचंड आकडेवारी लक्षात घेता, कोर्टाच्या आदेशांची वाट न पाहता प्रशासनानं याबाबतीत काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात अशी विनंती वर्षा आव्हाड आणि त्यांच्यासह राज्यभरातील लाखो शोकाकुल कुटुंबीय आपल्या पाणवलेल्या डोळ्यांनी व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India Vs Pakistan: वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
Suryakumar Yadav on Usman Tariq: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Video: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Dharashiv ZP: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
Narhari Zirwal NCP: नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक

व्हिडीओ

Jayant patil on Ajit pawar : माझी आणि दादा यांची 11 वेळा भेट झाली होती, विलिनीकरणावर जयंत पाटील काय म्हणाले?
Harshwardhan Sakpal vs Devendra Fadnavis on Tipu Sultan : टिपू सुलतानवरुन टीकेची तलवार
Dombivli Fire: डोंबिवलीत पहाटे भीषण आग, बेसमेंट पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक; पाच जण जखमी
Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Vs Pakistan: वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
Suryakumar Yadav on Usman Tariq: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Video: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Dharashiv ZP: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
Narhari Zirwal NCP: नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
Dombivli Fire: डोंबिवलीत पहाटे भीषण आग, बेसमेंट पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक; पाच जण जखमी
डोंबिवलीत पहाटे भीषण आग, बेसमेंट पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक; पाच जण जखमी
Mhada Lottery Home: म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पैसे भरण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पैसे भरण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीला गँगस्टरकडून 10 कोटींच्या खंडणीची धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ 
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीला गँगस्टरकडून 10 कोटींच्या खंडणीची धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ 
Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Embed widget