एक्स्प्लोर

Kurla Best Bus Accident: पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती; पण कुटुंबियांचा वेगळाच दावा, कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट

Kurla Best Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.

Kurla Best Bus Accident मुंबई: मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस रोडवर (Mumbai Kurla Bus Accident) काल (9 डिसेंबर) भीषण अपघात झाला. बेस्ट बसने अनेकांना धडक दिल्याने या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 ते 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला (Sanjay More) पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. तर कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील (Mumbai Kurla Best Bus Accident) बस स्थानक बंद आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून बेस्ट प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर- (Mumbai Kurla Best Bus Accident Update) 

बस चालक संजय मोरे हा 1 डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे. चालकाचे वय 54 वर्षे असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता. तसेच पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपी चालकाने याआधी कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण?, पोलीस तपास सुरू आहे. 

बस चालकाच्या कुटुंबियांचा वेगळाच दावा?

संजय मोरे हे बस चालक घाटकोपरच्या असल्फा विभागाचा रहिवासी आहे. अनेक वर्षे वाहन चालक म्हणून काम करीत आहेत. लॉकडाऊननंतर बेस्टमध्ये कंत्राटमध्ये ते कामाला लागले. तेव्हा पासून संजय मोरे बेस्टच्या बस चालवतात. ही मोठी इलेक्ट्रीक बस त्यांनी 10 दिवसांपूर्वी चालवयला सुरवात केली होती. त्याची देखील त्यांनी 10 दिवस ट्रेनिंग घेतली होती. संजय मोरे कधीही दारू पिऊन गाडी चालवत नाहीत, बसमध्ये काही तांत्रिक घडले असावे असा अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संजय मोरे हा 1 डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विविध प्रश्न निर्माण होत आहे.

संबंधित बातमी:

Kurla Bus Accident: वाऱ्याच्या वेगाने आली, नागरिक सैरावैरा पळाले; अंगावर काटा आणणारा कुर्ला बेस्ट बस अपघाताचा थरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी
उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी
राज्यातील बनावट औषध पुरवठा प्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा; कंपनींच्या बोगस पत्त्यावरून औषधांची डिलिव्हरी
राज्यातील बनावट औषध पुरवठा प्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा; कंपनींच्या बोगस पत्त्यावरून औषधांची डिलिव्हरी
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 10 December 2024Special Report Ladki Bahin Yojana :पडताळणी होणार? लाडकी बहीण छाननीच्या बंधनात?Special Report Vidhansabha : थँक्यू नाना, विधानसभेत नेत्यांचा डायलॉबाजीचा सुपर डुपर हिट शो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी
उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी
राज्यातील बनावट औषध पुरवठा प्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा; कंपनींच्या बोगस पत्त्यावरून औषधांची डिलिव्हरी
राज्यातील बनावट औषध पुरवठा प्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा; कंपनींच्या बोगस पत्त्यावरून औषधांची डिलिव्हरी
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Embed widget