Crime News: माता न तू वैरिणी! बाथरुममध्ये गोंडस मुलीला जन्म दिला अन् खिडकीतून थेट बाहेर फेकलं, म्हणाली...
Crime News:
Crime News: आई होणं म्हणजे, बाईला मिळालेलं वरदान. पण एका आईनं केलेलं कृत्य अत्यंत धक्कादायक आहे. एका महिलेनं आपल्या घराच्या शौचालयात बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर पोटच्या बाळाचाच जीव घेतला आहे. ही घटना 22 एप्रिलची आहे. महिलेनं बाळाला जन्म दिला खरा, पण त्यानंतर बाळ रडू लागलं. बाळाच्या रडण्याच्या आवाजानं महिला खूप घाबरली आणि महिलेनं कोणताही मागचा पुढचा विचार न करता बाळाला थेट शौचालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिलं. घटना कोलकात्यातील (Kolkata Crime News) आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली. आरोपी महिलेचं म्हणणं आहे की, तिला तिच्या गरोदरपणाची माहिती नव्हती. तिला नेहमीप्रमाणे मासिक पाळी येत होती. अशा परिस्थितीत जेव्हा ती शौचालयात गेली आणि तिनं अचानक बाळाला जन्म दिला, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. बाळ रडू लागलं, तिला काही सुचेनासं झालं. बाळाला पाहुन ती घाबरली आणि तिनं खिडकीची काच फोडली आणि नवजात बाळाला खिडकीतून बाहेर फेकून दिलं.
मानसिक आजारांनी ग्रस्त महिला?
पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी खिडकीच्या काचा फोडल्याचा आवाज आला. त्यावेळी शंका आल्यानं शेजाऱ्यांनी धाव घेतली. ज्यावेळी ते घटनास्थळी पोहोचले त्यावेळी जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत नवजात बाळ पडलेलं होतं. ते पाहून शेजाऱ्यांनी तात्काळा पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली. तर दुसरीकडे महिलेला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. महिला आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, बाळाचा मृत्यू झाला होता. महिला मानसिक आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तसेच, तिच्या गरोदरपणाबद्दल कुटुंबातील कोणालाही माहिती नव्हती, अशी माहितीही पोलीस चौकशीतून समोर आली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिला जून 2022 पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती आणि नोव्हेंबरमध्ये तिचं लग्न झालं होतं. महिलेचा पतीही मद्यपी आहे. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून महिलेविरुद्ध आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai Crime: माणुसकीला काळीमा... रेल्वे स्टेशनवरुन घरी आणलं, वाढवलं, नोकरी दिली; तिचाच गळा घोटला