Kolhapur Crime News: लिव्ह इन हत्याकांडाचा थरारक शेवट, आधी मैत्रिणीच्या बरगड्यात चाकू, आता पसार आरोपी शेतात लटकलेल्या अवस्थेत, कोल्हापूर हादरलं
Kolhapur Live in couple: समीक्षा सतीशसोबत गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. तेव्हापासून सतीशने तिला लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, तिने लग्नाला नकार दिला होता.

Kolhapur Crime News: लिव्ह इन पार्टनरची हत्या करणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय 23) हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, त्यांच्यात वाद झाल्याने मंगळवारी सतीश यादव याने समीक्षाची छातीत चाकू भोसकून हत्या (Kolhapur Murder) केली होती. यानंतर सतीश यादव हा फरार होता. गुरुवारी सकाळी सतीश त्याच्या मूळगावी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुडी येथे सतीश यादवने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीश यादवचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षा सतीशसोबत गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. तेव्हापासून सतीशने तिला लग्नासाठी तगादा लावला होता. यामधून सातत्याने त्यांचा वादही होत होता. भाड्याच्या घरी सातत्याने वाद होत असल्याने त्याने भाड्याचे घर खाली करण्यास सांगितले होते. समीक्षा मैत्रीसोबत इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती. दोघी मिळून सरनोबतवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहत होत्या. समीक्षा गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी सतीश यादव यांच्यासह लिव्ह इनमध्ये होती.
तेव्हापासून सतीशने सातत्याने लग्नाचा आग्रह धरला होता. मात्र, चार वर्षांपूर्वी समीक्षाचं लग्न झालं आहे. मात्र, ती कौटुंबिक वादामुळे पतीसोबत राहत नव्हती. प्रकरण न्यायालयात असल्याने तिने लग्नाला नकार दिल्याचे समजते. त्यामुळे सातत्याने समीक्षा आणि सतीशमध्ये वाद सुरू होते. याच वादातून समीक्षाला भाड्याची घर रिकामे करण्यास सुद्धा सांगण्यात आलं होतं. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून समीक्षा आईकडे बावड्यात राहत होती. मैत्रीणीसह ती सरनोबतवाडीमध्ये साहित्य आणण्यासाठी गाडीवरून गेल्या होत्या. यावेळी साहित्य आवरत असताना समीक्षाने सतीशला फोन केला.
यानंतर 15 मिनिटांच्या अंतराने सतीश सुद्धा त्याठिकाणी पोहोचला. सतीशने पुन्हा लग्नासाठी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी वाद आणखी वाढल्याने सतीशने अत्यंत निर्घृण पद्धतीने समीक्षाच्या छातीत चाकूने वार केले. छातीत खोलवर वाद झाल्याने समीक्षा जाग्यावर कोसळी. त्यानंतरही सतीशने तिच्यावर लाथांचा प्रहार करून बाहेरून घराचा दरवाजा बंद करून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षाला मैत्रीणीने मित्राच्या मदतीने पहिल्यांदा खासगी रुग्णालयानंतर सीपीआरमध्ये उपचाचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
























