एक्स्प्लोर

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लोहगडावरुन ढकलताच केतन झाडात अडकला; पहिला प्लॅन फसताच सियाने मिठी मारली आणि म्हणाली...

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी केतनला मारण्याचा पहिला कट 14 जून रोजीच रचला होता.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: पुण्याचे प्रसिद्ध तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal) यांच्या लोहगड किल्ल्यावरील मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला सेल्फी काढताना झालेला अपघात वाटणाऱ्या या घटनेत केतनची नियोजित वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. 

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी केतनला मारण्याचा पहिला कट 14 जून रोजीच रचला होता. त्या दिवशी त्यांनी केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन 'साप आला' अशी भीती दाखवत दरीच्या जवळ ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतू केतन त्यातून सुदैवाने वाचला. सियाने त्या घटनेला भलतंच स्वरुप दिले. केतनला सापापासून वाचवण्यासाठी आपण त्याला ढकलले आणि त्यानंतर त्याला मिठी मारुन वाचवलं, असं रियाने दावा केला होता, अशी माहिती विशाल अग्रवाल यांनी दिली. तसेच हा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर, सियाने 18 जून रोजी तिच्या वाढदिवसाचा बहाणा करून केतनला पुन्हा लोहगडवर नेले आणि प्रियकराच्या मदतीने 350 फूट खोल दरीत ढकलून दिले. मृतदेह पाहिल्यानंतरही सियाच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःख नसल्याने वडिलांना संशय आला आणि पोलिसांच्या सखोल तपासात या क्रूर कटाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

कोण आहे केतन अग्रवाल? (Who Is Ketan Agrawal)

  1. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा
  2. 25 वर्षीय केतन सिम्बॉयसिसमधून BBA चं शिक्षण घेतलं तर उच्चपदवी (MS) यूएसमधून घेतली.
  3. दोन वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण करुन तो भारतात आला आणि वडिलांच्या बांधकाम व्यवसायात उतरला.
  4. गेल्या वर्षी स्वतः एक बांधकाम साईट्सची निर्मिती करायला सुरुवात केली.
  5. फेब्रुवारी महिन्यात सिया सोबत साखरपुडा
  6. नोव्हेंबर महिन्यात भोवल्यावर चढण्यापूर्वी सिया आणि प्रियकर चेतनने हत्या केली.

कोण आहे सिया गोयल? (Who Is Siya Goyal)

  1. पुण्यातील व्यावसायिक प्रवीण गोयल यांची कन्या
  2. 20 वर्षीय सिया बी-कॉम शिक्षण ही घेत आहे.
  3. गोयल कुटुंबीयांचा ड्राय फ्रुटस-मसालेचा व्यवसाय
  4. सियाला मात्र मार्केटयार्ड परिसरात केक विक्रीची बेकरी टाकून देण्यात आली.

कोण आहे चेतन चौधरी? (Who Is Chetan Choudhari)

  1. पुण्यातील व्यावसायिक बाबूलाल चौधरी यांचा मुलगा
  2. 23 वर्षीय चेतनने बीबीएचं शिक्षण घेतलंय.
  3. दोन वर्षांपासून मार्केटयार्ड येथील वडिलांचा ड्राय फ्रुट्स-किराणा ट्रेडर्स व्यवसाय तो पाहतो.
  4. तो एक उत्तम क्रिकेटर सुद्धा आहे, रणजी क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न आहे.

सिया आणि चेतन हे दोघे कधीपासून संपर्कात?

मार्केटयार्डमधील व्यवसायाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली. गेली वर्षभर दोघांचं बोलणं सुरु झालं, मोबाईल नंबरची देवाण-घेवाण झाली. संवाद वाढली, मैत्री झाली. भेटी-गाठी, पार्टी, फिरायला जाणं, यातून प्रेमाचे संबंध निर्माण झाले.

आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी; केतनचे वडील काय काय म्हणाले?

केतनच्या मृत्यूबाबत वडील विशाल अग्रवाल म्हणाले की, त्यांचा (सिया गोयल आणि केतन अग्रवाल) फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता... ते 6 तारखेला बालीला जाणार होते; चौघे जण एकत्र प्रवास करणार होते, पण केवळ केतनचाच पासपोर्ट चोरीला गेला. त्यामुळे त्याला जाता आले नाही आणि विमानतळावरून परत यावे लागले. चेतन चौधरी दुचाकीवरून लोहगड किल्ल्यावर पोहोचला. ते दोघे (चेतन चौधरी आणि सिया गोयल) एकत्र वर गेले, त्यांनी केतन विशाल अग्रवालला एका वस्तूने मारले आणि वरून खाली फेकून दिले... पोलिसांनी खूप मदत केली आणि हे प्रकरण अत्यंत वेगाने सोडवले. स्थानिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी मोलाचे सहकार्य केले; त्यांनी त्वरित आम्हाला तपशील कळवला आणि त्या दोघांनाही अटक केली. जर तिला लग्न करायचे नव्हते, तर तिने सरळ नकार दिला असता; आम्ही त्वरित लग्न रद्द केले असते. त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याचे का ठरवले? त्यांची मानसिकता कशी आहे? त्यांची मानसिकता इतकी क्रूर आहे की एखाद्याचा 26 वर्षांचा मुलगा मारला जाऊ शकतो...समाजाने अशा क्रूर मानसिकतेची दखल घेणे गरजेचे आहे. ही विचारसरणी कुठून येते?, असा संतप्त सवाल विशाल अग्रवाल यांनी उपस्थित केला. सरकारला माझी एकच विनंती आहे की, या प्रकरणाची सुनावणी कोणत्याही परिस्थितीत जलद गतीने व्हावी...आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी...सर्वांपर्यंत एक स्पष्ट संदेश पोहोचवण्यासाठी त्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा मिळायला हवी, अशी मागणीही विशाल अग्रवाल यांनी केली. 

केतन अगरवालच्या हत्येनंतरचा घटनाक्रम-

- 18 जून केतन अगरवाल पाय घसरुन दरीत पडल्याचा बनाव
- दरीतून मृतदेह बाहे काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडे 'अशी' घटना घडेल का? पोलिसांची विचारणा आणि पहिला संशय
- सर्व विधी पार पडल्यावर 21 जूनला कुटुंबीय लोहगडावर पोहचले. केतनचा पडून मृत्यू झाला नसल्याचा पोलिसांकडे दावा
- मग सिया सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेंव्हा केतनची बहीण संजनाने सियावर प्रश्नांची सरबत्ती केली.
- लोहगडावर तुम्ही काय-काय केलं? कुठं-कुठं फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तेंव्हा तू खरंच फोटो काढत होतीस का? असे एकणानेक प्रश्न विचारताचं ती अनुत्तरित झाली
- बहीण संजनाच्या प्रश्नांनी सियावर संशय वाढला.
- वडील आणि बहिणींनी उपस्थिती केलेली शंका, दिलेले जबाब यातून तपासाची चक्र वेगाने हलली.
- जबाबात चेतन चौधरीचं नाव आलं. सिया आणि चेतनचे सिडीआर तपासण्यात आले. 
- सिया आणि चेतनमध्ये गेल्या वर्षभरात 2004 वेळा फोन कॉल झाल्याचं आणि तीनशेहुन अधिक तास संवाद झाल्याचं उघड
- पण 18 जूनला तेजसचं लोकेशन लोहगडावर आढळलं नाही. 
- एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून लोहगडाच्या सीसीटीव्हीत आढळला. 
- तोचं तरुण पुढं जाऊन सियाला काहीतरी खुनवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं.
- हा तरुण चेतन असेल तर मग फोन लोकेशन मार्केटयार्ड का दाखवतोय? मग पोलिसांची 18 जूनला चेतनच्या फोनवर आलेल्या व्यक्तींकडे विचारणा.
- चेतनचा फोन दुकानातील कामगारने उचलल्याचे आणि कामगाराचा फोन घेऊन चेतन लोहगडावर आल्याचं स्पष्ट
- 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतलं.
- तेजसला पोलिसी खाक्या दाखवताच सियाचं ही बिंग फुटलं.

संबंधित बातमी:

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget