एक्स्प्लोर

Kalyan Crime: कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुण हत्या प्रकरण; पोलिसांकडून भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या

Kalyan Crime: कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुण हत्या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहेय

Kalyan News Updates: कल्याणमध्ये (Kalyan Crime) चार दिवसांपूर्वी एका अल्पवयीन तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. समीर लोखंडे असं हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन तरुणाचं नाव होतं. समीर विरोधात देखील गुन्हे दाखल होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, पोलिसांनी काही तरुणांना अटकही केली होती. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता. 

या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्ये प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली होती. त्या दिवशी आकाश हा भाजपच्या एका मोर्चात सहभागी झाला होता. दरम्यान, घटनेच्या पूर्वी आकाश हा आरोपींच्या संपर्कात होता. मोबाईलच्या सीडीआरमुळे आकाश जैस्वालला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळखळ उडाली आहे.

अल्पवयीन तरुणाला बेदम महारहाण, तरुण गंभीर जखमी 

कल्याण पूर्वेत जुन्या वादातून काही तरुणांनी लाकडी दांडक्यानं केलेल्या मारहाणीत समीर लोखंडे या अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला होता. ज्या तरुणानं अन्य तरुणांसह समीरला मारहाण केली होती, तो तरुण देखील अल्पवयीनच आहे. समीरला जबर मारहाणीत गंभीर दुखापत झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही काळ समीरवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान समीरचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन तरुणांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं होतं. 

पोलीस तपासादरम्यान या प्रकरणात आणखी काही तरुणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस आकाश जैयस्वाल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश जैसवाल हा केडीएमसीच्या भाजप माजी उपमहापौर विक्रम तरे यांचा निकटवर्तीय आहे. ज्या दिवशी समीरला मारहाण केली जात होती. तेव्हा आकाश हा भाजपच्या निषेध मोर्चात सहभागी होता. मात्र या प्रकरणातील फिर्यादीनं आकाश जैयस्वाल याचं नाव घेतल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोबाईल सीडीआरमुळे आकाशचे नाव समोर आल्याची माहिती मिळत आहे. 

उपचारादरम्यान अल्पवयीन तरुणाचा मृत्यू 

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शुक्रवारी संध्याकाळी समीर लोखंडी नावाच्या अल्पवयीन मुलाला काही तरुण अपहरण करून घेऊन गेले. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान समीरचा मृत्यू झाला.

कोळसेवाडी पोलिसांकडून चार जण ताब्यात 

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय. ज्यामध्ये दोन अल्पवयीन आहेत. मुकेश उर्फ विठ्ठल काण्या आणि निरज दास या दोघांचा समावेश आहे. या प्रकरणात आकाश जैयस्वाल या तरुणालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आकाश जैसवाल हा केडीएमसीचा माजी उपमहापौर विक्रम तरे यांचा निकटवर्तीय आहे. घटनेच्या वेळी तो कोळसेवाडी पोलीस ठाण्यात होता. मात्र, मयत तरुणानं त्याचं फिर्यादीत नाव घेतल्यानं त्याचीही चौकशी पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापलेSupriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्यChandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
Beed Guardian Minister: बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवार मुंबईत येताच निर्णय होणार
Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
Embed widget