एक्स्प्लोर

घराशेजारी शौचालय बांधले, शेजारी राहणाऱ्या तरुणांनी तलवारीनं प्राणघातक हल्ला केला, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

विक्रांतवर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

Crime News: घराबाहेर शौचालय बांधण्याच्या वादातून एका तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना कल्याण उंबर्डे परिसरात घडली . विक्रांत जाधव असे या जखमी तरुणाचे नाव आहे . जाधव यांच्या शेजारी राहणाऱ्या गायकवाड कुटुंबातील तरुणांनी हा हल्ला केल्याचा आरोप विक्रांत जाधव आणि त्यांचे वडील विजय जाधव यांनी केला. विक्रांतवर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

नेमका प्रकार काय?

कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात विजय जाधव हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या शेजारीच गायकवाड कुटुंब राहते . विजय जाधव राहत असलेल्या घराच्या जागेवर गायकवाड कुटुंबीयांनी दावा केला असून या जागेवरून जाधव व गायकवाड कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत . विजय जाधव यांनी आपल्या घराशेजारी शौचालय बांधण्याचे काम सुरू केले होते. या कामाला गायकवाड कुटुंबाने विरोध केला . आठवडाभरापूर्वी हे काम सुरू असताना गायकवाड कुटुंब या ठिकाणी आले व त्यांनी हे काम बंद पडल्याचा आरोप विजय जाधव यांनी केलाय . तसेच गायकवाड कुटुंबियांनी त्यांना काम सुरू केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप देखील विजय जाधव यांनी केला . आज सकाळी विजय जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव हा घराशेजारील परिसरात पाणी आणण्यासाठी गेला. याच वेळेस विक्रांतला एकट्याला गाठून गायकवाड कुटुंबातील तरुणांनी विक्रांतवर तलवारीने हल्ला केला .या हल्ल्यात विक्रांत जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याणच्या रुक्मिणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. विजय जाधव यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी घराशेजारी शौचालय बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र, शेजारी राहत असलेल्या गायकवाड कुटुंबीयांनी या कामाला विरोध केला. वाद इतका वाढला की, दोन लाखांची मागणी करत तसेच जीव मारण्याची धमकीही देण्यात आली.

हेही वाचा:

Crime News: प्रसूतीवेळी महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा! वाशिम जिल्ह्यातील डॉक्टरांचा प्रताप, छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली अन्... 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Salil Deshmukh : मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार, सलील देशमुखांची रोखठोक भूमिका; नागपुरातील निवडक प्रचारानं चर्चेला उधाण
आधी राजीनामा, आता म्हणताय, मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार; सलील देशमुखांचा निवडक प्रचार चर्चेत
Karnataka Congress Crisis: डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
Shani Sade Sati: 2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
Sharad Pawar on Congress :  मुंबई पालिकेसाठी काँग्रेसचा 'स्वबळाचा' नारा: महाविकास आघाडीत तणाव! उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून नाराजी व्यक्त
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Salil Deshmukh : मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार, सलील देशमुखांची रोखठोक भूमिका; नागपुरातील निवडक प्रचारानं चर्चेला उधाण
आधी राजीनामा, आता म्हणताय, मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार; सलील देशमुखांचा निवडक प्रचार चर्चेत
Karnataka Congress Crisis: डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
Shani Sade Sati: 2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
Raj Thackeray: काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
Palghar News: सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
मोठी बातमी! सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
Embed widget