(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंजाबच्या तीन शार्प शूटर्सना कल्याणमध्ये अटक; तिघेही पंजाबमधील खत्री गँगचे सदस्य
Kalyan Crime News: पंजाबच्या (Punjab News) तीन शार्प शूटर्सना कल्याणमध्ये अटक करण्यात आली असून तिघंही पंजाबमधील खत्री गँगचे सदस्य असल्याची माहिती मिळत आहे.
Kalyan Crime News: पंजाबमधील (Punjab Crime News) तीन कुख्यात शार्प शूटर्सना कल्याणमधून (Kalyan Crime News) ताब्यात घेण्यात आलंय. पंजाब (Punjab News) अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस (Mumbai ATS) आणि खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) संयुक्त कारवाई करत शिवम सिंह, गुरुमुख सिंह, अमनदीप कुमार यांना ताब्यात घेतलं आहे. हे तिघे शार्प शूटर (Sharpshooter) पंजाबमध्ये हत्या करून मोहने परिसरात लपून बसले होते. हे तिघेही गुंड पंजाबमधील खत्री गँगचे (Khatri Gang) सदस्य असल्याची माहिती मिळत आहे.
पंजाबमध्ये हत्या करुन तिनही शार्प शूटर्सनी तिथून पोबारा केला होता. त्यानंतर त्यांनी कल्याण (Kalyan News) गाठलं आणि कल्याणमधील मोहने परिसरात लपून बसले. तेव्हापासूनच पोलीस त्यांच्या शोधात होते. अशातच खबरींकडून कल्याणमधील एका इमारतीत कुख्यात गुंड लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हापासूनच पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे अधिकारी परिसराची रेकी करत होते.
पाहा व्हिडीओ : Punjab Sharp Shooters : पंजाबच्या खत्री गँगच्या तीन शार्प शुटर्सना कल्याणमधून अटक ABP Majha
कल्याण पश्चिम येथील मोहने यादव नगर परिसरातील एका इमारतीत काही कुख्यात गुंड असल्याची माहिती पंजाब पोलिसांकडे होती. गेल्या दोन दिवसांपासून पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे अधिकारी कर्मचारी या परिसराची रेकी करत होते. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या टास्क फोर्स, मुंबई एटीएस आणि खडकपाडा पोलिसांच्या मदतीनं एका इमारतीत लपून बसलेल्या तीन शार्प शूटर्सना तब्येत घेतलं आहे. या कारवाईत खडकपाडा पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. हे तिघे पंजाबमध्ये झालेल्या मख्खन सिंह हत्याकांडात फरार होते. या हत्याकांडात पंजाब पोलिसांनी मनदीप सिंह या आरोपीला अटक केली होती. या आरोपींच्या चौकशी दरम्यान शिवम सिंह, गुरुमुख सिंह, अमनदिप कुमार या तिघांची नावं सांगितली आहेत. या तिघांना देखील आज सकाळच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या तिघांना कल्याण न्यायालयात हजर करून घेण्यात येईल आणि ट्रानझिक रिमांड घेत पंजाब पोलीस या तिघांना घेऊन पंजाबला रवाना होणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pune Crime : ऑडी चालवणाऱ्या लोकांना पत्ता विचारता का? म्हणत आलिशान कार चालकाकडून वकिलाला मारहाण