एक्स्प्लोर

Kalyan News : रेल्वे प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारुन मोबाईल चोरी, सराईत चोरटा अटकेत

रेल्वेमध्ये चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोन परत मिळणं म्हणजे नशिबच म्हणावं लागेल. कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रवाशाचा मोबाईल फोन चोरणाऱ्या अशाच एका चोरट्याचा पाठलाग करुन त्याला अटक केली.

मुंबई : ट्रेनमध्ये मोबाईल फोन हरवण्याचे किंवा चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास घडतात. पण चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोन परत मिळणं म्हणजे नशिबच म्हणावं लागेल. परंतु कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रवाशाचा मोबाईल फोन चोरणाऱ्या अशाच एका चोरट्याचा पाठलाग करुन त्याला अटक केली. दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर काठी मारुन खाली पडलेला मोबाईल घेऊन हा चोरटा पळ काढत होता.

लोकल आणि एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारत मोबाईल चोरणाऱ्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कसारा ते इगतपुरी दरम्यान गोदावरी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाच्या हातावर काठी मारत खाली पडलेला मोबाईल चोरुन पळणाऱ्या आरोपीला गस्तीवर असणाऱ्या कल्याण रेल्वे पोलिसांच्या पथकाने पाठलाग करत पकडले. या दरम्यान आरोपीने पाठलाग करणाऱ्या पोलिसांनाही काठीचा धाक दाखवून पळून जाण्याच्या प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी धाडसाने त्याला अटक केली. गोरख शिगवे असं या चोरट्याचं नाव असून या चोरट्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. चोरी केलेले मोबाईल फोन तो त्याचा साथीदार आकाश भल्ला याच्या मदतीने विकत असल्याचे तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी आकाश भल्ला यालाही बेड्या ठोकल्या.

26 एप्रिल रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास गोदावरी एक्स्प्रेसच्या फूटबोर्डवर बसून 19 वर्षीय सोमनाथ धोत्रे हा विद्यार्थी कसारा ते इगतपुरी प्रवास करत  होता. गाडी कसारा स्टेशनहून मार्गस्थ होताच सोमनाथ दरवाज्यात उभा राहून फोनवर बोलत होता. त्याचवेळी ट्रॅकच्या शेजारी हातात काठी घेऊन उभ्या असलेल्या गोरखने त्याच्या हातावर फटका मारला. हा फटका मोबाईल फोनवर बसल्याने विद्यार्थ्याच्या हातातून फोन खाली पडला. मग गोरखने मोबाईल फोन उचलून पळ काढला. यानंतर सोमनाथने देखील त्याच्या पाठीमागे उडी मारली. प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला त्यावेळी त्या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ या चोराचा पाठलाग सुरु केला. या दरम्यान गोरखने पोलिसांना काठीचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या धाडसाने त्याला पकडले. त्याची झडाझडती घेतली असता त्याच्याकडून चोरलेला मोबाईल फोन मिळाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या. 

पोलिसांच्या माहितीनुसार हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विविध पोलिस स्थानकात त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरलेले सात मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. तपासादरम्यान हा गोरख चोरी केलेले मोबाईल आकाश भल्ला या आपल्या साथीदाराला विकत असल्याचं समोर आलं. मग रेल्वे पोलिसांनी त्याला देखील अटक केली.

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget