एक्स्प्लोर

Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'

Jitendra Shelke Accident: छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ जितेंद्र शेळकेंच्या कारचा अपघात झाला. यामध्ये जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाला.

Jitendra Shelke Accident:  नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) यांचा शुक्रवारी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) झालेल्या भीषण अपघातात (Accident) मृत्यू झाला. संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार कंटेनरखाली घुसली. या अपघातात जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला होता. या अपघाताविषयी (Accident news) घातपाताची शंका उपस्थित करण्यात आल्याने पोलिसांकडून संबंधित कंटेनर चालकाला शनिवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पोलिसांकडून काल याप्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी राजकीयदृष्ट्या हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याने आता कंटेनर चालकाची चौकशी करुन या दुर्घटनेमागे घातपात होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. (Maharashtra Crime news)

जितेंद्र शेळके यांची कार भरधाव वेगात असताना समृद्धी महामार्गावर कंटेनरला जाऊन धडकली होती. कार वेगात असल्याने कंटेनरच्या खाली जाऊन जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. हा कंटेनर उत्तर प्रदेशच्या (UP) अमेठी येथील जमाल वारिस हा चालवत होता. जमालने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक जबाबामध्ये आपली बाजू मांडली. त्याने म्हटले की, मी हैदराबादवरुन अहमदाबादकडे जात असताना शुक्रवारी दुपारी 12 वाजता कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्याने गाडी गरम झाली होती. त्यामुळे मी कंटेनर रस्त्याचा बाजूने हळू वेगात घेऊन चाललो होतो. मी कंटेनर थांबवला नव्हता, फक्त वेग कमी होता. त्यावेळी मागून कार येऊन माझ्या कंटेनरला (Truck Car Accident) धडकली, असे जमाल वारिस याने पोलिसांना सांगितले. मला मागून जोरात आवाज आला. पण मला आरशात काही दिसले नाही. मी खाली उतरुन बघितले तेव्हा कार ठोकलेली दिसली, असेही त्यांनी सांगितले.  आता पोलिसांकडून जमालची आणखी कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीतून काही नवीन माहिती समोर येणार का, हे बघावे लागेल. 

आणखी वाचा

हा अपघात घडवून आणला नाही ना? खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू; रोहित पवार, सुषमा अंधारेंना संशय, खळबळजनक दावा

अशोक खरातला अटक होताच तणावात गेले, आज कार थेट कंटेनरखाली घुसली; जितेंद्र शेळकेंसह पत्नीचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?, PHOTO

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget