Jalna Crime: 70 लाख रुपयांची खंडणी मागितली, जालन्यात तिघांना अटक; आरोपींकडून 21 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
Jalna Crime: पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Jalna Crime: जालना शहरातील गांधी चमन परिसरात एका संस्थाचालकाकडे तब्बल 70 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी या तिघांकडून 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, उर्वरित आरोपींचा शोधही सुरू आहे.
संस्थाचालकाने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, या तिघांनी संगनमत करून संस्थाचालकाला धमकी दिली आणि 70 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
70 लाखांची खंडणी मागणारे तिघे ताब्यात
जालना शहरातल्या गांधी चमन भागात एका संस्थाचालकाला जवळपास 70 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय. शिवाय त्यांच्याकडून 7 लाख 91 हजार 500 रुपये रोख रक्कम,10 लाख रुपयांची कार,1200 रुपयांचे लायटर, खंडणीच्या पैशातून खरेदी केलेले 1 लाख 7 हजार रुपयांचे दागिने आणि 2 लाख 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.दरम्यान संस्थाचालकाच्या फिर्यादीवरून या तिघांवरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. आणि ताब्यात घेतलेल्या तिघांवर यापूर्वी काही गुन्हे होते का याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे.
आरोपींकडून 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून 7 लाख 91 हजार 500 रुपये रोख रक्कम, 10 लाख रुपयांची कार, 1200 रुपयांचा लायटर, 1 लाख 7 हजार रुपयांचे दागिने, 2 लाख 5 हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा सर्व माल खंडणीच्या रकमेतून खरेदी करण्यात आला होता, अशी माहितीही समोर आली आहे. या तिघांविरोधात खंडणीसह अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा
धक्कादायक! बहिणीच्या प्रेमसंबंधाचा संशय, बिअर बारमध्ये जात तरुणाला निर्घृणपणे संपवले,घटना CCTVत कैद























