धक्कादायक! बहिणीच्या प्रेमसंबंधाचा संशय, बिअर बारमध्ये जात तरुणाला निर्घृणपणे संपवले,घटना CCTVत कैद
बारमधील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींची ओळख पटली असून त्यांच्याविरोधात पोलिस तपास सुरू आहे. आरोपी फरार असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे हट्टा पोलिसांनी सांगितले

Hingoli Crime: राज्यात किरकोळ कारणावरून होणाऱ्या हत्या, मारहाणीचे प्रकार वाढत असताना हिंगोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील हयातनगर फाटा शिवारात एका बिअर बारमध्ये प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणीच्या भावाने युवकाला चाकूने भोसकत संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात आणखी एक तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचा संपूर्ण प्रकार बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.ही घटना मंगळवारी (24जून) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. (Crime News)
नक्की काय घडले?
वसमत तालुक्यातील थोरावा येथील विशाल मुंजाजी देवरे त्याचा मित्र ओमकार नरवाडे याच्यासोबत मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हयातनगर पाटीजवळील एका बियर बार मध्ये बसले होते. यावेळी थोरावा येथीलच गोपाळ देवरे, ऋषीकेश कदम, शिवाजी देवरे हे तिघे आले. यामध्ये दोघांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून तेथे बसलेल्या विशाल व ओमकार याच्यावर चाकूने वार करण्यास सुरवात केली. दरम्यान, आचानक झालेल्या या हल्यामुळे दोघेही प्रतिकार करू शकले नाही. यामध्ये विशाल याच्या पोटावर खंजीरचा वर्मी वार बसला तर ओमकार याच्याही पोटावर वार बसले होते. या घटनेमध्ये विशाल देवरे याचा जागीच मृत्यू झाला आहे तर ओमकार नरवाडे हा गंभीर इथे जखमी झाला आहे. या प्रकरणात तीन आरोपीच्या विरोधामध्ये हट्टा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रेम संबंधाच्या कारणावरून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. दरम्यान हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
प्रेमसंबंधातून तरुणाचा खून
हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हट्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि जखमीला उपचारासाठी हलवलं. दरम्यान, या घटनेमागे प्रेमसंबंधासंबंधित वाद असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत विशाल आणि आरोपींमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोपाळ देवरे, ऋषीकेश कदम आणि शिवाजी देवरे या तिघांविरोधात हत्या, खुनाचा प्रयत्न आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल केला आहे. बारमधील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींची ओळख पटली असून त्यांच्याविरोधात पोलिस तपास सुरू आहे. आरोपी फरार असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे हट्टा पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा























