धक्कादायक! अमृतसरमधून पोस्टातून जालना शहरात आल्या २२ तलवारी, गुन्हे शाखेने आवळल्या दोघांच्या मुसक्या
जालन्यात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोस्टातून शहरात आलेल्या २२ तलवारींना जप्त करण्यात आले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Jalna Crime: जालन्यातून सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमृतसरच्या शस्त्रविक्रीच्या दुकानातून पोस्टाच्या पार्सलमधून जालना शहरात २२ तलवारी मागवण्यात आल्या होत्या. याबाबत जालन्यातील गुन्हा शाखेने कारवाई केली असून अवैधरित्या शस्त्रे मागवणाऱ्यांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. या २२ तलवारींसह ४४ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आलाय. आदित्य काटकर आणि राजू काटकर असे दोन आरोपींची नावे आहेत.
अमृतसर येथून जालन्याच्या पोस्टऑफीसमध्ये २२ तलवारींचं पार्सल आल्याचं गुन्हे शाखेला कळलं. ३१ जुलै रोजी पोस्टात आलेल्या पार्सलमध्ये २२ तलवारी आढळल्यानंतर हेड पोस्ट ऑफिसला कळवून सापळा रचून गुन्हे शाखेने दोघांच्या मुसक्या आवळल्या. इतक्या तलवारी नक्की कशासाठी मागवण्यात आल्या याची अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नसून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई
आरोपी आदित्य राजु काटकर व मंगेश राजु काटकर यांना अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, दि. 15/07/2024 रोजी आम्ही व साथीदार असे सर्वजण अमृतसर येथुन शस्त्रविक्रीचे दुकानातुन मागविलेल्या एकुण 22 तलवारी तीन वेगवेगळ्या पार्सलमध्ये आज पोस्ट ऑफीस येथे आल्या आहेत. आमच्या जवळील बॉक्स सोडुन आणखी दोन बॉक्स पोस्ट ऑफीसमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पोस्ट ऑफीस येथे खात्री केली असता तेथे दोन बॉक्स मिळुन आले ते चेक केले असता त्यामध्ये तलवारी मिळुन आल्या. अश्या एकुण 22 तलवारी 44,000/- रुपये किंमतीच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
पोस्ट ऑफिसमध्ये लावला सापळा
अवैध तलवारींच्या पार्सलची माहिती मिळाल्यानंत पथके तयार करुन जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपींची माहीती घेण्यास पाठविण्यात आले. खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, जालना शहरात इसम आदित्य राजु काटकर रा. लोधी मोहल्ला जालना व त्याचे इतर साथीदार यांनी पोस्टाद्वारे काही तलवारी मागविलेल्या असुन सदर तलवारी आज रोजी डिलीव्हरी साठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. अशी माहीती मिळाल्यावर सदरची माहीती वरिष्ठांना कळवुन हेड पोस्ट ऑफीस जालना येथे सापळा लावुन