भांडे घासायची पावडर विकायला आले, चोर समजून जमावाने लोखंडी पाईपसह दगडाने फोडून काढलं, 45 जणांवर गुन्हा दाखल
या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर परतुर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Jalna Crime: भांडे घासण्याची पावडर विकण्यासाठी तांड्यावर आलेल्या तिघांना चोर समजून जमावाने लोखंडी पाईपसह लाठी,काठी,पट्टे दगड लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यातील गुळखंड तांडा भागात घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परतुर पोलीस ठाण्यात 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमध्ये मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
चोर समजून जमावाची तिघांना बेदम मारहाण
जालना जिल्ह्यातील गुळखंड तांडा येथे सोमवारी सायंकाळी तिघांना चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली. लाठ्या काठ्या, पट्टे, लोखंडी पाईप, दगड, लाकडी दांडे आणि लाथा बुक्क्यांसह जमावाने या तिघांना फोडून काढण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर याप्रकरणी परतुर पोलीस ठाण्यात 45 जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या मारहाणीत तिघेजण गंभीररित्या जखमी झाले असून गुळखंड तांड्यावर मोठा जमाव होता. आरोपींमध्ये दोघांनी या तरुणांभोवती लोकांची गर्दी जमवत तुम्ही चोर आहात असा ओरडा केला. त्यानंतर तिघांनाही जमावाने जबर मारहाणीत जखमी केले.
मारहाणीचा व्हिडिओ समोर, 45 जणांवर गुन्हे
या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर परतुर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची पुढील कारवाई परतुर पोलीस करत आहेत. या व्हिडिओमध्ये तांड्यांवर मोठा जमाव दुचाक्या थांबवत तरुणांना बेदम मारहाण करताना दिसत आहे. रत्यावरच्या तीन तरुणांना अडवत हा राडा झाल्याचे समोर आले असून दगड, लाकडी दांडे, पट्टे, दगड व रस्त्यावर दिसेल त्या वस्तूने तरुणांना जमावाने बेदम मारहाण केल्याचे समोर आले. परतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातील कात्रज घाटात पुन्हा गोळीबाराचा थरार!
पुण्यातील कात्रज घाटात गोळीबाराची घटना घडली आहे. यात कात्रज घाटामध्ये दोघांकडून फायरिंग करण्यात आली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार दीपक लोकर या एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्डबॉयवर ही फायरिंग करण्यात आली आहे. या गोळीबारच्या घटनेमध्ये दीपक लोकर हा जखमी झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास दीपक लोकर याला एका अज्ञाताने कात्रज घाटात नेत फायरींग केली आहे. यात दीपक यांच्या छातीमध्ये ही गोळी अडकली असून घटना स्थळावरती पिस्टल पोलिसांना मिळाली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.