अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
Jalgaon Crime News : बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला संपवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडला आहे.
![अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप Jalgaon Crime News minor girl molested and killed in Chopda taluka Maharashtra Marathi News अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/08/33d95a2769b58e617dec13d3bb1c1fd41725790313447923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना जळगाव (Jalgaon Crime News) जिल्ह्यात चोपडा (Chopada) तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) एका संशयितास ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील विरवाडे परिसरात दोघी बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या. कामावरून मालापूरकडून दोघी घरी परतताना बारा वर्षीय चिमुरडीला 25 वर्षीय संशयिताने विरवाडे शिवारातील शेतात ओढून नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला.
दगडाने ठेचून अल्पवयीन मुलीची हत्या
त्यानंतर तिचा दगडाने ठेचून निघृण खून केला. खुनानंतर संशयिताने विवस्त्र अल्पवयीन मुलीला घटनास्थळावरून शंभर फूट ओढत नेत कापसाच्या शेतात फेकून दिले. मुलगी घरी परतली नसल्याने तिचा शोध घेत असताना, कापसाच्या पिकात तिचा अर्धनग्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनेची माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्यासह शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरविली. जळगावहून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)