Indian Railway : चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
Utkal Express Disable Woman Passenger Molested : ओडिशातून उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या दिव्यांग महिलेसोबत एक धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी उत्कल एक्सप्रेसच्या पँट्री कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली.
Indian Railway News : देशभरात, राज्यभरात महिलांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ होत असून त्यावर सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अशातच रेल्वेचा प्रवासदेखील महिलांसाठी सुरक्षित राहिला नसल्याचं समोर आलं आहे. ओडिशाहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या एका दिव्यांग महिलेचा चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. झारखंडमधील चक्रधरपूरमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी रेल्वेच्या पँट्री कारमधील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तो कर्मचारी दारूच्या नशेत होता असंही समोर आलं आहे.
झारखंडमधील उत्कल एक्सप्रेस ट्रेनमध्ये पँट्री कार अटेंडंटने एका दिव्यांग महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. कटक ते जाजपूर दरम्यान पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणाने त्या महिलेला वाचवले. त्यानंतर आरोपीला जीआरपीने चक्रधरपूर रेल्वे स्थानकावर अटक केली.
पँट्री कारमधील कर्मचाऱ्याचे कृत्य
ही महिला दिव्यांग असून ती उत्कल एक्स्प्रेसने ओडिशाहून उत्तर प्रदेशला जात होती. पँट्री कारमधील एका कर्मचाऱ्याने टॉयलेटमध्ये घुसून त्या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता. चक्रधरपूर जीआरपीने आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
कटक आणि जाजपूर दरम्यानची घटना
पीडितेने सांगितले की, पहाटेच्या वेळी ती जागेवरून उठली आणि बाथरूममध्ये गेली. त्यानंतर संधी साधून आरोपी कर्मचारीही बाथरूममध्ये घुसला आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला. महिलेने अलार्म वाजवताच ट्रेनमधील इतर प्रवाशांनी तिला वाचवले. ही घटना पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान कटक ते जाजपूर दरम्यान घडली.
आरोपीने तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती त्या महिलेने दिली. त्यावेळी महिलेने आरडाओरडा सुरू केला.
शौचालय उघडल्याने तरुणीचा जीव वाचला
घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी सांगितले की, महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून ते टॉयलेटच्या दिशेने धावले. त्यावेळी दोन तरुणांनी टॉयलेट उघडून महिलेला आरोपीपासून वाचवले. घटनेची माहिती मिळताच जीआरपीने आरोपी कर्मचाऱ्याला चक्रधरपूर रेल्वे स्थानकावर अटक केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध पुढील कारवाई सुरू केली आहे.
ही बातमी वाचा: