एक्स्प्लोर

आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याचं प्रकरण, इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना

Mumbai Human Finger in Ice Cream : मुंबईत आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याच्या प्रकरणात एफडीएने इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे : आईस्क्रीममध्ये (Ice Cream) मानवी बोट (Human Finger) सापडल्याच्या प्रकरणात फॉर्च्यून डेअरी बंद (Fortune Dairy Indapur) ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील मालाडमध्ये एका महिलेला आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. ही घटना बुधवारी घडली. महिलेने  ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचं आईस्क्रीम मागवलं होतं. आता या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना

एफडीएने  (Food and Drug Administration) इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यम्मो आईस्क्रीममध्ये बोट सापडल्या प्रकरणी FDA ने या सूचना दिल्या आहेत. यम्मो कंपनी इंदापूर, गाजियाबाद आणि पुणे येथील कंपनीतून आईस्क्रीम घेते. आईस्क्रीमध्ये बोट कुठल्या कंपनीतील आईस्क्रीमध्ये सापडलं ते अद्याप समोर आलेलं नाही. बोट कुठल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हे अद्यार माहिती नसलं तरी आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासनाने दिल्या आहेत.

आईस्क्रीममध्ये सापडलं मानवी बोट

मुंबईच्या मालाडमधील एका महिलेने ऑनलाईन पद्धतीने यम्मो कंपनीचं (EMOI) आईस्क्रीम मागवले होते. तिने ते आईस्क्रीम कोन खायला सुरुवात करताच तिला त्यामध्ये मानवी बोटाचा तुकडा दिसला. आईस्क्रीममध्ये मानवी अवयवाचा तुकडा पाहातच महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काही क्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. पण त्यांना सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ मलाड पोलीस ठाणे गाठलं. मालाड पोलिसांनी (Malad Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

मानवी अवयव फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला

मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला. या महिलेने ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन मागवला होता. त्यानंतर या महिलेला आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला. यानंतर घाबरलेल्या महिलेने मालाड पोलीस ठाणे गाठले. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे आईस्क्रीम तपासासाठी पाठवलं आहे. मालाड पोलिसांनी आईस्क्रीममध्ये सापडलेला मानवी अवयव पोलिसांनी फॉरेन्सिककडे (FSL) पाठवला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जामीन मिळाला, पण अरविंद केजरीवालांची तुरुंगातून सुटका होईल? जामीनाविरोधत ईडीची उच्च न्यायालयात धाव
जामीन मिळाला, पण अरविंद केजरीवालांची तुरुंगातून सुटका होईल? जामीनाविरोधत ईडीची उच्च न्यायालयात धाव
शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना
शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना
Munjya Box Office Collection Day 14 : बॉक्स ऑफिसला 'मुंज्या'ने झपाटलं, दोन आठवडे सुस्साट, किती झाली कमाई?
बॉक्स ऑफिसला 'मुंज्या'ने झपाटलं, दोन आठवडे सुस्साट, किती झाली कमाई?
Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी 127 जागा हेरल्या, 'या' मंत्र्यांना टार्गेट करणार, एक्झिट पोलही सांगणार
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी 127 जागा हेरल्या, 'या' मंत्र्यांना टार्गेट करणार, एक्झिट पोलही सांगणार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या जीवाला धोका? पोलीस अधिक्षकांना दिलं पत्र ABP MajhaVijay Wadettiwar FULL PC : सरकारने दोन समाजात भांडणं लावली, विजय वडेट्टीवारांची टीकाSanjay Raut PC FULL : सरकार गुंडांच्या हातामध्ये, लोकसभा निवडणुकीत त्यांचा वापर झाला ABP MajhaYoga Day Special : Yoga Guru Hansaji Yogendra यांची Exclusive मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जामीन मिळाला, पण अरविंद केजरीवालांची तुरुंगातून सुटका होईल? जामीनाविरोधत ईडीची उच्च न्यायालयात धाव
जामीन मिळाला, पण अरविंद केजरीवालांची तुरुंगातून सुटका होईल? जामीनाविरोधत ईडीची उच्च न्यायालयात धाव
शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना
शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना
Munjya Box Office Collection Day 14 : बॉक्स ऑफिसला 'मुंज्या'ने झपाटलं, दोन आठवडे सुस्साट, किती झाली कमाई?
बॉक्स ऑफिसला 'मुंज्या'ने झपाटलं, दोन आठवडे सुस्साट, किती झाली कमाई?
Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी 127 जागा हेरल्या, 'या' मंत्र्यांना टार्गेट करणार, एक्झिट पोलही सांगणार
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी 127 जागा हेरल्या, 'या' मंत्र्यांना टार्गेट करणार, एक्झिट पोलही सांगणार
इंडिगोच्या फ्लाइटमध्ये हेव्ही एयर टर्ब्युलन्स; प्रवासी भेदरले, रडू लागले, 30 मिनिटं आकाशातच विमानाच्या घिरट्या
इंडिगोच्या फ्लाइटमध्ये हेव्ही एयर टर्ब्युलन्स; प्रवासी भेदरले, रडू लागले, 30 मिनिटं आकाशातच विमानाच्या घिरट्या
TMKOC :  'तारक मेहता का...' मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट? 16 वर्ष काम केल्यानंतर मालिका सोडल्याचे कारण...
'तारक मेहता का...' मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट? 16 वर्ष काम केल्यानंतर मालिका सोडल्याचे कारण...
Sonali Bendre :  'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये मोठा बदल, सोनाली बेंद्रे ऐवजी 'ही' अभिनेत्री परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार?
'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये मोठा बदल, सोनाली बेंद्रे ऐवजी 'ही' अभिनेत्री परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार?
Manoj Jarange Patil: सरकारने आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हाला पाजतील; रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना इशारा
सरकारने आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हाला पाजतील; रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना इशारा
Embed widget