एक्स्प्लोर

मुंबई क्राइम ब्रॅंचने केला हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिला कलाकारासह तिघींची सुटका

मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून इतर तीन महिलांची सुटका केली आहे. सुटका केलेल्या तीन महिलांमध्ये एका भोजपूरी महिला कलाकाराचा समावेश आहे.

मुंबई: मुंबईच्या ईस्टर्न सबर्ब परिसरातील एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मुंबई क्राइम ब्रँचच्या यूनिट 7 ने केला आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून इतर तीन महिलांची सुटका केली आहे. यामध्ये एका चित्रपट कलाकार महिलेचा समावेश आहे.

क्राइम ब्रॅंचचे डीसीपी अकबर पठान यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की त्यांच्या टीमला या रॅकेटमध्ये मॉडेल्स आणि अभिनेत्रींचा समावेश असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक बोगस ग्राहकाच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आणला.

या बोगस ग्राहकाने आरोपी महिला कविता भोसलेशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने चित्रपट जगतातल्या मॉडेल्स किंवा कलाकार महिलेची मागणी केली. सुरुवातीला आरोपी महिलेने यावर बोलायला नकार दिला पण नंतर काही दिवसांनी त्या ग्राहकावर जेव्हा विश्वास बसला तेव्हा तिने पैशाची मागणी केली. तिने आपल्याकडे अशा अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्री आहेत असं सांगूण 55 हजारांची मागणी केली.

पैशाचा व्यवहार ठरल्यानंतर आरोपी महिलेनं तीन मॉडेल्स दाखवण्याचं आश्वासन दिलं. या तीन महिलांना घेऊन आरोपी भोसले ही घाटकोपर परिसरातील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये आली. या तीन महिलांमध्ये एक भोजपूरी चित्रपटातील प्रसिध्द कलाकार होती. तिने टीव्ही सीरियलमध्येही काम केलंय. इतर दोन महिला या मॉडेल्स होत्या.

हॉटेलच्या रुममध्ये आरोपी महिला या तिघींसोबत पोहचली त्यावेळी क्राईम ब्रँचच्या एक टीमने छापा मारला आणि आरोपी महिलेला रंगे हात पकडलं. या प्रकरणाचा मास्टर माइंड अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून तो फरार असल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस त्याचा तपास करत आहेत.

आरोपी महिला कविता भोसलेची अधिक चौकशी केली असता पोलिसांना समजलं की ती या महिलांकडून 30 टक्के कमिशन घेत होती. मुंबई पोलिसांच्या या आधीही टाकलेल्या छाप्यात बी टाउनशी संबंधित लोक या देहव्यापाराच्या रॅकेटमध्ये सामिल असल्याचं उघड झालंय.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget