एक्स्प्लोर

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, त्यांच्याशी ओळख, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणं पुण्यातील डॉक्टरला भोवलं, गुन्हा दाखल

Tukaram Mundhe : पुण्यातील एका डॉक्टरनं तो तुकाराम मुंढेंचा डॉक्टर असून काही काम असल्यास करुन देऊ असल्याचा मेसेज व्हाटस ॲप ग्रुपवर टाकला होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Tukaram Mundhe News  पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे राज्यभर चर्चेत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवायांमुळं त्यांच्याविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून एफडीएनं आईसक्रीम पार्लर, हॉटेल्स, दूध डेअऱ्यांची तपासणी करत कारवाई केली आहे. राज्यात एफडीएनं काही ठिकाणी कारवाई करत दूध भेसळखोरांवर देखील कारवाई केलीय आणि मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका व्यक्तीनं तो तुकाराम मुंढे यांचा डॉक्टर असून त्यांच्यासोबत ओळख असून काही काम असल्यास करुन देऊ, असा मेसेज व्हाटस ॲप ग्रुपवर टाकला. या प्रकरणामुळं संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यातील डॉक्टरवर गुन्हा

पुण्यातील एका डॉक्टरनं तुकाराम मुंढेंचे आपण डॉक्टर असून आपली त्यांच्याशी ओळख आहे,  त्यांच्याकडे काही काम असल्यास आपण करुन देऊ असा मेसेज व्हाटस ॲप ग्रुपवर टाकला होता. हा मेसेज टाकणं डॉक्टरला महागात पडलं आहे. या मेसेज प्रकरणी पुण्यातील डॉक्टरवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हिमांशू अजवानी असं या 48 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टरचं व्हाटसअप चॅट समोर आल्यानंतर FDA कडून तक्रार करण्यात आली होती. तुकाराम मुंढेंच्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसल्याच तक्रारीत म्हटलंय.

मुंबईतील पारसी डेअरीचा परवाना एफडीएकडून रद्द

मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील शतकभर जुन्या आणि प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई करत संस्थेचा परवाना निलंबित केला आहे. बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीत स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

1916 मध्ये स्थापन झालेले पारशी डेअरी फार्म हे मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित खाद्य आस्थापनांपैकी एक मानले जाते. मात्र, तपासणीत आढळलेल्या कथित स्वच्छतेच्या त्रुटींमुळे FDA ने ही कारवाई केली. यापूर्वीही FDA ने स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालिमार रेस्टॉरंट आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंट यांच्या परवान्यांवरही निलंबनाची कारवाई केली होती.

अलीकडच्या काळात मुंबईतील नामांकित आणि वारसा लाभलेल्या खाद्य आस्थापनांवर FDA कडून स्वच्छता नियमांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने कारवाई केली जात आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, त्यांच्याशी ओळख, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणं पुण्यातील डॉक्टरला भोवलं, गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा
Khalil Shaikh Ravindra Dhangekar : खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
धक्कादायक! जळगावात धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाखांची बॅग लंपास, 24 तासाच्या आत चार आरोपींना अटक
धक्कादायक! जळगावात धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाखांची बॅग लंपास, 24 तासाच्या आत चार आरोपींना अटक
Siya Goyal : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लॅन, सिया गोयल-चेतन चौधरीनं जपानी व्हिडिओ पाहिले, चौकशीत धक्कादायक बाब समोर 
केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लॅन, सिया गोयल-चेतन चौधरीनं जपानी व्हिडिओ पाहिले
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget