![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Goldie Brar Death : सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत भरदिवसा गोळ्या घालून हत्या, डल्ला-लखबीरने घेतली जबाबदारी
Gangster Goldie Brar Death News : पंजाबसह अनेक राज्यांच्या पोलिसांना हवा असलेला दहशतवादी गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या करण्यात आली आहे.
![Goldie Brar Death : सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत भरदिवसा गोळ्या घालून हत्या, डल्ला-लखबीरने घेतली जबाबदारी Goldie Brar death mastermind of siddhu Moosewala murder case killed in America Goldy Brar latest marathi update Goldie Brar Death : सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत भरदिवसा गोळ्या घालून हत्या, डल्ला-लखबीरने घेतली जबाबदारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/01/7ead24cb617e94eff061ad52a31f8bc3171456331154493_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gangster Goldie Brar Death News : सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गोल्डी ब्रारला भारत सरकारने दहशतवादी घोषित केलं आहे. गोल्डी ब्रारच्या हत्येची जबाबदारी त्याच्या विरोधी टोळीतील ही अमेरिकेतील डल्ला लखबीरने घेतली आहे.
कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोल्डी ब्रार हा सिद्धू मूसवाला हत्याकांडातील मुख्य संशयित म्हणून पंजाब पोलिसांना तसेच इतर राज्यांच्या पोलिसांना हवा होता. काही महिन्यांपूर्वीच गोल्डी ब्रारला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केले होते.
मुसेवालाच्या हत्येचा कट रचला
सिद्धू मुसेवाला हत्याकांडात वाँटेड असलेल्या गोल्डी ब्रारच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचं मान्य केलं होतं. 2022 मध्ये पंजाबमधील एका विद्यार्थी नेत्याच्या हत्येचा बदला म्हणून मुसेवालाच्या हत्येचा कट रचल्याचे त्याने सांगितले होते.
कोण आहे गोल्डी ब्रार?
गोल्डी ब्रारचा जन्म 11 एप्रिल 1994 रोजी झाला. त्याच्या वडिलाचं नाव शमशेर सिंग तर आईचं नाव प्रीतपाल कौर असं आहे. तो पंजाबच्या श्री मुक्तसर साहिबचा रहिवासी आहे. गोल्डी ब्रारचे वडील पोलिसात नोकरीला होते. गोल्डी ब्रारवर राजकारण्यांकडून धमकीचे फोन करणे, खंडणीची मागणी करणे आणि अनेक खुनाची जबाबदारी घेणे असे गुन्हे दाखल आहेत.
गोल्डी ब्रारचा चुलत भाऊ असलेल्या गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डीने गुन्हेगारीचा मार्ग निवडला आणि अनेक गुंडांच्या संपर्कात येऊ लागला. कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे राहणारा गोल्डी ब्रार खलिस्तानी दहशतवादी गट बबजारशी संबंधित होता. केंद्रीय मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, शार्प-शूटर्सचा पुरवठा करण्याव्यतिरिक्त, गोल्डी ब्रार सीमेपलीकडून दारूगोळा आणि स्फोटक सामग्रीची तस्करी आणि खून करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पुरवण्यातही सामील होता.
रेड कॉर्नर नोटीस जारी
इंटरपोल सेक्रेट्रिएट जनरल (IPSG), फ्रान्सने गोल्डी ब्रार विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. 15 जून 2022 रोजी त्याच्याविरुद्ध लूक आउट परिपत्रक जारी करण्यात आले होते. यानंतर 12 डिसेंबर 2022 रोजी गोल्डी ब्रार विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.
गोल्डी ब्रार 2023 मध्ये कॅनडाच्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत 15 व्या क्रमांकावर होता. खून, हत्येचा कट आणि शस्त्रास्त्रांची तस्करी या गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)