Gold smuggling : मजुरांच्या मदतीने वाढली सोन्याची तस्करी, नागपुरात तस्करांना पकडलं
विमानातून उतरल्यानंतर या प्रवाशांचे हावभावही वेगळेच दिसत होते. अधिकाऱ्यांना संशय आला, त्यानंतर कसून चौकशी करण्यात आली. एका व्यक्तीकडे 265 ग्रॅम सोने, तर दुसऱ्या व्यक्तीकडे 882 ग्रॅम सोने आढळले.
नागपूर: नागपूर विमानतळ (Dr Babasaheb Ambedkar International Airport) हे तस्करांचे ठिकाण झाले आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विमानतळावर (Airport Gold smuggling) दररोज सोने तस्कर पकडले जात आहेत. गुरुवारी पहाटे, डीआरआय नागपूरने दोहाहून आलेल्या काहींना पकडले. सुमारे 1.1 किलो सोने लपवून आणले होते. या सोन्याची किंमत 59.10 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रवासी कतार एअरवेजच्या विमानातून (Qatar Airways) आले होते.
मुख्यत: विमानातून उतरल्यानंतर या प्रवाशांचे हावभावही वेगळेच दिसत होते. विमानतळावरील अधिकाऱ्यांना संशय आला, त्यानंतर कसून चौकशी करण्यात आली. एका व्यक्तीकडे 265 ग्रॅम सोने मिळाले ज्याची किंमत 13.66 लाख रुपये आहे, तर दुसऱ्या व्यक्तीकडे 882 ग्रॅम सोने होते. ज्याची किंमत 45.44 लाख रुपये आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीआरआयने गेल्या महिन्यातही विमानतळावर सोने पकडले होते.
नागौर टोळीही पकडली
नुकतेच दोहाहून आलेले कामगारही सोन्याच्या तस्करीत पकडले गेले. त्यांच्याकडून 380 ग्रॅम सोने सापडले. हे लोक टोळी तयार करून सोन्याची तस्करी करत होते. कामगारांनी हे सोने हातोड्यात लपवून ठेवले. पोलिसांनी या नागौर टोळीचा पर्दाफाश केला होता.
हातोड्यातून तस्करी
काही दिवसांपूर्वी मजूरांद्वारे सोने तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात आले होते. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या अवजारांमध्ये सोने लपवून आणले होते. यावेळी त्यांचे तिकीटाची व्यवस्था आणि त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्रही यावेळी त्यांना पाठविण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यांनाही अटक करण्यात आली होती.
तस्करीसाठी मजुरांचा वापर वाढला
मजूरांनी सोन्याची तस्करी करण्यासाठी नवी शक्कल लढवली आणि पकडल्या जाऊ नये म्हणून हातोडा, मोठे स्टेपलर व इतर काही अवजारांमध्ये असलेल्या छिद्राच्या माध्यमातून त्यात सोने वितळून टाकले. अवजारांमध्ये सोने वितळून लपवले जाते आणि नंतर हे अवजार एखाद्या मजुराच्या माध्यमातून भारतात पाठवले जाते. सहा सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील आझमगडचा मजूर राहुल यादव दुबई वरून भारतात परत आला. आपल्याकडील अवजारांची बॅग त्याने नागपूर विमानतळावरील पार्किंगमध्ये अक्रम मलिक आणि इर्शाद खान नावाच्या नागौर जिल्ह्यातील दोघांच्या हवाली केली. दुबई वरून (Gold Smuggling Nagpur) सोने तस्करी होत असल्याच्या संशयावरून आधीच विमानतळावर पाळत ठेवलेल्या नागपूर पोलिसांना तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी बॅग ची तपासणी केली आणि त्यात हातोडा, स्टेपलर आणि इतर अवजार पाहून ह्या वस्तू दुबई वरून विमानाने कशा आणि का आणल्या या प्रश्नांचे उत्तर तिघे देऊ शकले नाही. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील अवजारांची सोनारकडून तपासणी केली असता, छुप्या छिद्रातून 337 ग्रॅम सोने तस्करी केल्याचे उघड झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या