एक्स्प्लोर

Gadchiroli Naxal : माओवाद्यांनी केली आणखी एकाची हत्या; नक्षल शहीद सप्ताहा दरम्यान आठवड्याभरात दुसरी हत्येची घटना

Gadchiroli Naxal News : नक्षल शहीद सप्ताह दरम्यान नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याचे प्रयत्न असतात. अशीच एक घातपाताची घटना माओवाद्यांनी गडचिरोलीत केली आहे.

Gadchiroli Naxal गडचिरोलीनक्षलवाद्यांकडून (Naxal) संपूर्ण दंडकारण्यामधे 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत नक्षल शहीद सप्ताह पाळला जातो. माओवादी नेता चारू मजुमदार, पेद्दी शंकर आझादसह आजवर चकमकीत ठार झालेल्या माओवादी नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माओवादी दरवर्षी हा शहीद सप्ताह साजरा करतात.या दरम्यानच्या काळात नक्षली (Naxal) मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असतात. अशीच एक घातपाताची घटना माओवाद्यांनी गडचिरोलीत (Gadchiroli Naxal) केली आहे.

भामरागड तालुक्यातील मिरगुडवांचा येथील लालू मालू दुर्वा (वय 40) या व्यक्तीची माओवाद्यांनी हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्याभरातली ही सलग दुसरी हत्येची घटना आहे. या हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आठवड्याभरात दुसरी हत्येची घटना

गडचिरोलीच्या भामरागड तालुका मुख्यालयापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम अशा मिरगुडवांचा गावात ही हत्या करण्यात आलीय. महत्वाचे म्हणजे माओवादी संघटनेच 28 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यत शहीद सप्ताह  सुरू आहे. याच पाश्वभूमीवर ही हत्या करण्यात आली आहे. आठवड्याभरातच नक्षलवाद्यांकडून दुसरी हत्या करण्यात आली आहे. 26 जुलै रोजी भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जयराम गावडे याची पोलीस खबरी असल्याचं संसशयावरून हत्या करण्यात आली होती. 26 जुलैच्या मध्यरात्रीच्या दरम्यान नक्षल्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून ही हत्या केली.

त्यानंतर परिसरात दहशत निर्माण व्हावी, या अनुषंगाने मृतदेह मुख्यरस्त्यावर आणून ठेवला. ही घटना उजेडात येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असताना आणखी एक तशीच एक हत्येची घटना उजेडात आली आहे. त्यामुळे माओवादी दंडकारण्यात पुन्हा सक्रिय झाले आहेत का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

शहीद सप्ताह निमित्य घातपाताचा डाव

नुकतेच छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बुधवारी 17 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली जवळच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक घडली. या पोलीस-नक्षलवादी चकमकीत महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या C-60 कमांडोंनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. परिणामी, नक्षलवाद्यांचे टिपागड दलम आणि चातगाव -कसनसूर दलम कायमचे संपुष्टात येऊन उत्तर गडचिरोली सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या घटनेला अवघे काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा माओवाद्यांच्या घातपाताच्या घटना उजेडात आल्या आहेत. पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी एक इसमास बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केली होती. त्या पाठोपाठ आणखी एक तशीच हत्येची घटना उजेडात आली आहे. त्यामुळे या नक्षल्यांच्या घातपातांच्या घटनांचा बीमोड करणे हे पोलिसांच्या पुढील आव्हान असणार आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget