एक्स्प्लोर

बीफ जवळ बाळगल्याचा संशय घेऊन रेल्वेत वृध्दाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस भरतीची तयारी करणारे तिघे ताब्यात

Suspicion of Carrying Beef in Nashik: नाशिकमध्ये एका ट्रेनमध्ये 4 -5 तरूण गोमांस बाळगल्याच्या संशयावरून रेल्वेत एका वृद्धाला मारहाण करत असल्याचा संतापजन व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी आता रेल्वे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

मुंबई: सोशल मिडियावरती काल दिवसभरात एक व्हिडिओ सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. रेल्वेमध्ये एका वृध्द व्यक्तीला गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची घटना समोर आली होती. नाशिकमध्ये एका ट्रेनमध्ये 4 -5 तरूण गोमांस बाळगल्याच्या संशयावरून रेल्वेत एका वृद्धाला मारहाण करत असल्याचा संतापजन व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी आता रेल्वे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. 72 वर्षीय वृद्ध गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यामुळे सहप्रवाशांनी वृद्धाला मारहाण केली, ही घटना 28 ऑगस्टला घडली आहे. या प्रकरणाची दखल पोलिसांनी देखील घेतली आहे. या व्हायरल व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्या तरूणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Suspicion of Carrying Beef in Nashik)

नेमकं प्रकरण काय?

मुंबईहून धुळे – सीएमएमटी एक्सप्रेसमध्ये 28 ऑगस्टला हा प्रकार घडला. जळगावमध्ये राहणारा वृद्ध प्रवासी कल्याणमध्ये आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणकडे जायला निघाला होता. नाशिक रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर वृद्धाचा बसण्याच्या जागेवरून तरूणांशी वाद झाला होता. या तरुणांनी वृद्धाकडे गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला, त्याचवेळी त्याच्या सामानाची तपासणी केली. यावेळी आपण म्हशीचे मांस घेऊन जात असल्याचे वृद्धाने सांगितल्यानंतर तरूणांनी वृद्धाला मारहाण केली. यावेळी काही तरूणांनी या घटनेचे व्हिडीओ शेअर केला आता तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पोलीस भरतीसाठी मुंबईला येणारे तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे हे तिघेजण मुंबईला पोलीस भरतीसाठी जात होते. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी (Railway Police) या घटनेची गंभीर दखल घेतली. तसेच या प्रकरणात रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवेंच्या आदेशानंतर सदर पीडित व्यक्तीला पोलिसांनी शोधलं. हाजी अशरफ अली असे या व्यक्तीचे नाव आहे. हाजी अशरफ अली हे मुळचे चाळीसगावचे राहणारे असून 28 ऑगस्टला ते कल्याणमध्ये राहत असलेल्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी येत होते. (Suspicion of Carrying Beef in Nashik)

कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेन आल्यानंतर यांच्याकडे बीफ असल्याच्या संशयावरून तरुणांनी त्यांना मारहाण केली. अशरफ अली यांना कल्याण रेल्वे स्थानकात या तरुणांनी उतरू दिले नाही. नंतर त्यांना ठाणे रेल्वे स्थानकात उतरावे लागले.आकाश आव्हाड, नितेश अहिरे, जयेश मोहिते अशी तिघांची नावे आहेत. अटक केलेले तिघे तरुण हे मूळचे धुळ्याचे आहेत. त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

इम्तियाज जलील यांची संबंधितांवर कडक कारवाई मागणी 

या प्रकरणाची दखल एमआयएम पक्षाचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही घेतली असून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशा घटनांचा आम्ही ताकदीने विरोध करू. आम्ही मूक साक्षीदार होऊ शकत नाहीत. आता वेळ आली आहे, धर्मनिरपेक्ष भारतीयांनी एकत्र येऊन या माजोरड्या शक्तींविरोधात आवाज उचलायला हवा. या तरुणांमध्ये इतके विष कसे काय भिनले आहे. आजोबांच्या वयाच्या व्यक्तीशी असे वागण्याचा विचार हे तरुण कसे काय करू शकतात? असा प्रश्न मला पडतो, असंही जलील यांनी म्हटलं आहे. (Suspicion of Carrying Beef in Nashik) 

अजित पवारांची घटनेसंबधी पोस्ट 

इगतपुरी भागात दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रवासादरम्यान एका वृद्ध प्रवाशाला संशयाच्या आधारावर मारहाण करण्यात आल्याची घटना समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आज मी संबंधित रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, आणि अशा असामाजिक घटकांना आमच्या महायुती सरकारकडून कोणताही थारा मिळणार नाही अशी सोशल मिडीया पोस्ट अजित पवारांनी केली आहे. 

आपल्या महाराष्ट्रात ही घाण नकोच! - अभिनेता हेमंत ढोमे

अजित पवारांची ही पोस्ट पुन्हा शेअर करत अभिनेता हेमंत ढोमे यांनी अजित पवारांचे आभार व्यक्त करत आपल्या महाराष्ट्रात ही घाण नकोच, असं म्हटलं आहे. सोशल मिडीयावर याबाबतची पोस्ट शेअर करत "खूप खूप धन्यवाद दादा! आम्हाला खात्री आहे आपण स्वतः लक्ष घालून अपराध्यांना कठोर शिक्षा मिळवून द्याल! जेणेकरून आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असं वागण्याची कोणाची पुन्हा हिंमत होणार नाही! आपल्या महाराष्ट्रात ही घाण नकोच!", असं म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pimpri Crime:बिहारहून पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढणार तितक्यात...Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 06 PM 18 Sep 2024TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 18 September 2024 : ABP MajhaJai Malokar MNS Crime Case : मृत्यूआधी जय मालोकरला जबर मारहाण? धक्कादायक माहिती समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Men's Menopose: महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
Kadambari Jethwani : तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणारी कादंबरी जेठवाणी आहे तरी कोण? अधिकारी निलंबित झाल्याने नेमकं घडलं तरी काय?
तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणारी कादंबरी जेठवाणी आहे तरी कोण? अधिकारी निलंबित झाल्याने नेमकं घडलं तरी काय?
Embed widget