शॅम्पूच्या बाटलीतून 20 कोटींच्या कोकेनची तस्करी, केनियातून मुंबईत येताच महिला DRI च्या जाळ्यात
DRI ने मोठी कारवाई करत आरोपी महिलेकडून 1,983 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत ही 20 कोटी रुपये इतकी आहे.
मुंबई : शॅम्पूच्या बॉटलमधून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलेस DRI ने मुंबई विमानतळावर अटक केली आहे. आरोपी महिला ही नैरोबीहून मुंबईकडे प्रवास करत होती. DRI ने तिच्या सामानातून अंमली पदार्थांनी भरलेल्या दोन शॅम्पू बाटल्या हस्तगत केल्या आहेत. विशिष्ठ रासायनिक मिश्रणाच्या माध्यमातून ही महिला शॅम्पूच्या बॉटलमधून कोकेनची तस्करी करत होती. जप्त केलेल्या शॅम्पूतील अंमली पदार्थांची किंमत ही बाजारात अंदाजे 20 कोटी इतकी असल्याची माहिती DRI ने दिली.
मुंबई विमानतळावर केनियावरून येणाऱ्या एका महिलेकडे कोकेन असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता एका महिलेकडे डीआरआयला 20 कोटी रुपये किमतीचे 1,983 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं. हे कोकेन शॅम्पू आणि लोशनच्या बाटलीतून आणलं जात होतं.
The Directorate of Revenue Intelligence (DRI) Mumbai has arrested a female passenger who arrived at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport from Nairobi and recovered 1,983 grams of a viscous liquid concealed in two shampoo and lotion bottles. Upon testing, the… pic.twitter.com/I3hglzHZQN
— ANI (@ANI) August 16, 2024
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टंन्सेस अॅक्ट, 1985 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिला न्यायालयीन कोठडी देण्यातआली आहे. DRI चे अधिकारी या सिडिंकेटमधील इतर आरोपींच्या सहभागाबाबत तपासणी करत आहेत.
ही बातमी वाचा: