(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! मस्करीने घेतला बालकाचा जीव, गुदद्वारात कॉम्प्रेसरद्वारे हवा भरल्याने मृत्यू
Dhule Crime News : टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dhule Crime News धुळे : टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुदद्वारात दोघांनी हवा (Air) भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) हॉटेल सिटी पॉईंटच्या आवारात घडली आहे. बालकाची मस्करी करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात (Mohadi Police Station) दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम याचे टायर पंक्चरचे दुकान आहे. या दुकानात त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईक 14 वर्षीय मुलगा हा देखील काम करायचा. त्यांच्या दुकानाशेजारीच गॅरेज असून त्या ठिकाणी रोहित राजू चंद्रवंशी आणि शिवाजी लक्ष्मण सुळे हे दोघे काम करतात.
गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने भरली हवा
शेजारीच दुकान असल्याने एकमेकांचे चांगले संबंध होते. सकाळी नेहमीप्रमाणे दोघांचे दुकान उघडे होते. मात्र मोहम्मद मुजाहिद आलम हे सकाळी १० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घरी गेले होते. त्यामुळे बालक हा दुकानात एकटाच होता. यावेळी शिवाजी सुळे आणि रोहित यांनी त्याची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरली.
बालकाचा दुर्दैवी मृत्यू
त्यामुळे बालकाचा पोटात हवा गेल्याने त्याला त्रास होवू लागला. त्यानंतर शिवाजी आणि रोहित या दोघांनीच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र बालकाच्या आतड्यांना आणि नसांना दुखापत झाल्याने ऑपरेशन करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ऑपरेशन थिएटरमध्ये नेले असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या