Dharashiv Crime News: सोनं, पोस्टातील पैसेही दिले, नर्तकीच्या नादी लागून नको नको ते केलं; धाराशिवमधील अश्रुबा कांबळेने जीवन संपवलं
Dharashiv Crime News: धाराशिवमधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Dharashiv Crime News: धाराशिवमधील एक धक्कादायक (Dharashiv Crime News) माहिती समोर आली आहे. धाराशिवमध्ये कलाकेंद्रातील नर्तकीच्या नादी लागून 25 वर्षीय अश्रुबा कांबळे या तरुणाची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर अश्रुबा कांबळेची आत्महत्या नाही, तर हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय? (Dharashiv Crime News)
कला केंद्रातील नर्तकीच्या नादाला लागून उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर आता धाराशिवमध्ये नर्तकीच्या नादाला लागून 25 वर्ष तरुणांना आत्महत्या केली. अश्रुबा कांबळे असे तरुणाचं नाव आहे. धाराशिव येथील साई कला केंद्रातील नर्तकीने सततचा तगादा लावला. नर्तकीसोबतच्या प्रेम संबंधामुळे अश्रुबा कांबळेची पत्नी त्याला सोडून गेली. घरातील सोनं पैसे दिले. पोस्टातील आरडीमोडून अश्रुबा कांबळेने प्रेयसीला पैसे दिले. त्यानंतरही वारंवार पैशाची मागणी होत होती असा आरोप कुटुंबीयकडून केला जात आहे. शिवा अश्रूवाची आत्महत्या नसून हत्या आहे आम्हाला न्याय द्या, अशी मागणी कुटुंबाने केली.
महिलेसोबत प्रेमसंबंधातून झाले होते वाद- (Dharashiv Crime News)
अश्रुबा अंकुश कांबळे वय वर्ष 25 या तरुणाचे धाराशिवमध्ये कला केंद्रातील महिलेसोबत प्रेमसंबंधातून वाद झाले होते. यानंतर अश्रुबा कांबळेने गळफास घेऊन जीवन संपवले होते. अश्रुबा कांबळे रुई ढोकी या गावचा रहिवाशी आहे. गेल्या पाच वर्षापासून अश्रुबा कांबळे आणि धाराशिवमध्ये कला केंद्रातील महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे.























