एक्स्प्लोर

Delhi Crime News: 6 वर्षांच्या चिमुरडीचं सामुहिक लैंगिक शोषण; 13 ते 15 वर्षांच्या 3 मुलांचं अमानवी कृत्य, दिल्ली हादरली!

Delhi Crime News: उत्तर-पूर्व दिल्लीतील भजनपुरा परिसरात 6 वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

Delhi Crime News: उत्तर-पूर्व दिल्लीतील भजनपुरा परिसरात 6 वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 13, 14 आणि 15 वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे राजधानी दिल्लीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 जानेवारी रोजी घडली असून, त्याच दिवशी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिल्लीबाहेरील रहिवासी असून, ते भजनपुरा परिसरात एका फॅक्टरीत काम करत होते.

Delhi Crime News: आमिष दाखवून फसवणूक

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलीला खाण्याचे आमिष दाखवून आपल्या सोबत नेले. त्यानंतर तिला एका इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पीडित मुलगी गंभीर अवस्थेत घरी परतल्यानंतर कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आला. पीडितेला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी प्रकरण अधिक गंभीरतेने हाताळत तपास सुरू केला आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Delhi Crime News: 24 जानेवारीला परिसरात संतप्त निदर्शने

या घटनेची माहिती पसरताच 24 जानेवारी रोजी भजनपुरा परिसरात नागरिकांनी संतप्त निदर्शने केली. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Bhusawal Crime News : नववीत शिकणाऱ्या दोन मैत्रिणींना विहिरीत ढकलून संपवलं; एकतर्फी प्रेमातून घटना घडल्याचा संशय, गावकऱ्यांनी संशयितांची घरे पेटवली

Nashik Crime News: पुण्यानंतर नाशिकमध्ये उच्चशिक्षित विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न, आधी वाद घातला नंतर घरी बोलावलं अन्...; नेमकं प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्या

पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
Embed widget