Cyber Crime : ना ओटीपी दिला, ना बँक डिटेल्स शेअर केले; तरीही खात्यातून उडवले 14 लाख रुपये
Cyber Crime : ना ओटीपी दिला, ना बँक डिटेल्स शेअर केले तरीही एका 72 वर्षाच्या व्यक्तीच्या बँक खात्यातून 13.8 लाख रुपये लंपास केले.
![Cyber Crime : ना ओटीपी दिला, ना बँक डिटेल्स शेअर केले; तरीही खात्यातून उडवले 14 लाख रुपये Cyber Crime news cyber fraud new case 72 yrs old pune man downloads apk app and lost 14 lakh Cyber Crime : ना ओटीपी दिला, ना बँक डिटेल्स शेअर केले; तरीही खात्यातून उडवले 14 लाख रुपये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/0ae239777fd2c5dc01e729fba865f0641693026498218841_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cyber Crime : सायबर फसवणुकीचे (Cyber Fraud) अनेक घटना समोर येतात. वेगवेगळ्या पद्धतीने सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटना घडत असतात. सायबर क्राईमचा एक नवी घटना समोर आली आहे. एका 72 वर्षीय वृद्धाला४ 13.8 लाख रुपयांचा फटका बसला आहे. पुण्यात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.
सायबर चोरांनी या 72 वर्षीय वृद्धाच्या बँक खात्यातून 13.86 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे. या गुन्ह्यात पीडित व्यक्तीने कोणतेही बँक डिटेल्स शेअर केले, ना कोणताही ओटीपी शेअर केला नव्हता.
पॅन कार्डच्या नावाखाली फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीला ऑगस्ट महिन्यात एका अनोळखी क्रमांकावर फोन कॉल आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगितले. त्यावेळी चोराने वृद्धाने पॅन कार्ड अपडेट न केल्यास मोठे नुकसान होईल असे म्हटले.
अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले
सायबर चोरांनी या पीडित वृद्धाला पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने पीडित व्यक्तीला APK App इन्स्टॉल करण्यास सांगितले. हे अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर युजर्सच्या फोनमध्ये छेडछाड करण्यात आली.
बँक ओटीपी कसा अॅक्सेस केला?
एकदा अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर युजर्सच्या फोनवरून OTP आणि बँक तपशील ऍक्सेस केला जातो. यानंतर पीडितेच्या बँक खात्यातून 13.86 लाख रुपये काढण्यात आले. हा व्यवहार अनेक खात्यांमध्ये झाला आहे. वृद्धेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
APK App ने बिघडवला
पोलिसांनी सांगितले की, वृद्ध व्यक्तीने एपीके अॅप इन्स्टॉल केला होता. एपीके अॅपचे पूर्ण नाव अँड्रॉइड अॅप्लिकेशन पॅकेज आहे. अज्ञात स्त्रोताकडून अॅप स्थापित करणे खूप धोकादायक आहे. त्याच्या मदतीने हॅकर्स तुमच्या स्मार्टफोनचा रिमोट ऍक्सेस घेतात. या प्रकरणात नेमकी हीच बाब झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)