एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

भारतावर सायबर हल्ला! ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

Cyber attack on India : Thane Police Official Website Hack : ठाणे (Thane Police) शहर पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. हॅकरने वेबसाइट हॅक केली आहे, त्यांनी भारत सरकारसाठी संदेश लिहिला आहे.

Thane Police Official Website Hack : भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक (Cyber Attack) करण्याचं आवाहन केलं. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच संदेश हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्यानंतर दिला आहे. 

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "या ग्रुपनं 'opspatuk' किंवा प्रतिहल्ला (StrikeBack) हे ऑपरेशन सुरू केलं असून, त्याचा अर्थ स्ट्राईक बॅक असा होतो. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक (Website Hack) झाल्या आहेत. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच एक संदेश सर्व वेबसाईटवर देण्यात येत आहे. यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील शक्यता आहे."

गेल्या काही दिवसांपासून देशात मंदिर-मशीद मुद्दा चांगलाच तापला आहे. तसेच मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्यावरील टिप्पणी प्रकरणामुळं देशात अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्यासह मुस्लिम समाजातील दिग्गजांनी देशात मुस्लिम असुरक्षित असल्याची वक्तव्य केली आहेत. 

दरम्यान, राज्य सरकारच्या गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. सध्या ठाणे पोलिसांची वेबसाईट रिस्टोअर करण्याचं काम सुरु आहे. 

जगातील मुस्लिमांची माफी; वेबसाईट हॅक झाल्यानंतर हॅकर्सचा मेसेज 

ठाणे शहर पोलिसांच्या (Thane Police) अधिकृत संकेतस्थळावर लिहिलेल्या संदेशात याची नोंद करण्यात आली आहे. हॅकर्सनी लिहिलं आहे की, "भारत सरकार, तुम्ही इस्लामच्या संदर्भात वारंवार अडथळे आणता, तुम्हाला सहिष्णुता दिसत नाही, जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही."

नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईटही झाली होती हॅक

दोन दिवसांपूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (Institute Of Science) शासकीय विज्ञान महाविदयालयाची वेबसाईट हॅक झाली होती. याची जबाबदारीही ड्रॅगन फोर्स ऑफ मलेशिया या संघटनेन (Dragon Force Of Malsiya) घेतल्याची माहिती त्यावेळी मिळाली होती. यात भारताविरुद्ध मोहीमेचा (anti India campaign) भाग म्हणून साईट हॅक केल्याचा मेसेजचा त्या वेबसाईटवर उल्लेख करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
Bihar Election Result 2025 बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal on Bihar Election :बिहारमध्ये काँग्रेसचं काय चुकलं? हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
Vijay Wadettiwar On Bihar Result :त्यांचा विजय होणारच होता,बिहार निकालावर वडेट्टीवार असं का म्हणाले?
Harshwardhan Sapkal on Bihar Election : महाविकास आघाडीत कोणतंही भांडणं नाही, सपकाळ स्पष्टच म्हणाले..
BJP Celebration : एनडीएला बिहारमध्ये घवघवीत यश,  भाजपकडून जल्लोष साजरा
Sudhir Mungantiwar On Bihar Result : 2014 पासून बिहारच्या विकासाला गती मिळाली - मुनगंटीवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
Bihar Election Result 2025 बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
Pune Crime News: आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली;  नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली; नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
Bypoll Election Results 2025: बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
Crime News: बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
Bihar Election Result 2025: जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
Embed widget