इंटरनेटवर जोडप्याचा प्रायव्हेट VIDEO अपलोड केला; ब्लॅकमेलिंगचा कट रचला, मित्रानेच घात केला!
Mumbai Crime: मित्रानं अश्लील व्हिडीओ तर व्हायरल केलाच, पण ब्लॅकमेल करून 50 हजार रुपये घेतल्याचाही आरोप महिलेनं केला आहे.
Mumbai Crime News : मुंबई : एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मुंबईत (Mumbai News) एका विवाहित महिलेचा तिच्याच पतीसोबतचा एक अश्लिल व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्याच एका जवळच्या मित्राला अटक केली आहे. मित्रानं अश्लील व्हिडीओ तर व्हायरल केलाच, पण ब्लॅकमेल करून 50 हजार रुपये घेतल्याचाही आरोप महिलेनं केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोशुआ फ्रान्सिस असं आरोपीचं नाव आहे. आरोपी पीडित महिला आणि तिच्या पतीचा जवळचा मित्र आहे. महिलेचा पती मद्यपी असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. महिलेचा पती दारू पिऊन धिंगाणा घालायचा, अनेकदा पत्नीशी भांडायचा. एक दिवस दारूच्या नेशतच महिलेच्या पतीनं तिच्यासोबतच्या शारिरीक संबंधांचा व्हिडीओ बनवला. यानंतर महिलेच्या पतीनंच हा व्हिडीओ मित्र फ्रान्सिसला दिला. मित्रानं या नवरा-बायकोचा व्हिडीओ एका अश्लिल साईटवर अपलोड केला.
कांदिवलीतील समता नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्लिल साईटवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर फ्रान्सिसनं महिलेला फोन करून याबाबत माहिती दिली. त्यांनी वेबसाईटची वेब URL देखील शेअर केली. यानंतर तिच्यासमोर या घटनेबाबत खोटी चिंता व्यक्त केली. त्यानंतर उपाय म्हणून महिलेला त्यांनी सांगितलं की, त्याचा एक मित्र विकास हा सायबर एक्सपर्ट आहे. तो अश्लील व्हिडीओ हटवू शकतो.
पुढे महिलेच्याच मित्रानं विकास म्हणून व्हॉट्सअॅप कॉल केला. त्यानं महिलेला सांगितलं की, तो वेबसाईटवरुन कंटेंट डिलीट करू शकतो, पण, त्यासाठी 50 हजार रुपये द्यावे लागतील. पीडित महिला पैसे देण्यासाठी तयार झाली. त्यानंतर काही दिवसांनी तिचा व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले. त्यानंतर महिलेनं पोलिसांशी संपर्क करुन या प्रकरणात आरोपीच्या विरोधात आपली तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी फ्रान्सिसला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. त्यानं कबूल केलं की, त्याला महिलेच्या पतीनंच व्हिडीओ आणि फोटो पाठवलेले. त्यानं त्यांना आधी पॉर्न साईटवर अपलोड केलं. त्यानंतर त्याला डिलीट करण्यासाठी महिलेकडून पैसे घेतल्याचंही आरोपीनं मान्य केलं आहे.