एक्स्प्लोर

Crime News: शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे अन् रोहिणी कुंभार यांना अटक; राज्यस्तरीय ‘एसआयटी’ची कारवाई

Crime News: नागपूरसह राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Crime News: नागपूरसह राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तपासासाठी गठीत ‘एसआयटी’ने विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांच्याही चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक नव्या आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याने पोलीस सत्र न्यायालयात ‘रिव्हिजन’ अर्ज दाखल करणार असल्याची ही माहिती आहे.

राज्यस्तरीय एसआयटी गठीत झाल्यानंतरची ही पहिली मोठी कारवाई असून एबीपी माझा ने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून रीतसर शालार्थ आयडीचे आदेश जारी झाले नसताना..  मात्र शिक्षण विभागातील काही भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केला व बनावट शालार्थ आयडी तयार केले. त्या माध्यमातून बोगस शिक्षकांना कोट्यवधी रुपयांचा वेतन अदा करून शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्यात आला.

पोलिसांकडून दोघांनाही अटक-

सदर प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले आरोपी व दस्तावेजांच्या तपासानंतर पोलिसांना या प्रकरणात सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार यांचादेखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले. सिद्धेश्वर काळुसे हे १६ मार्च २०२४ पासून आजपर्यंत शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर रोहिणी कुंभार या २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत शिक्षणाधिकारी होत्या. त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी जारी झाल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बुधवारी अटक केली.

पोलिसांचीच राज्यपातळीवर एसआयटी गठित-

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आता पोलिसांचीच राज्यपातळीवर एसआयटी गठित करण्यात आली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणी सर्व तक्रारीची या एसआयटी अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे. नागपुरातील झोन 2 चे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा हे सध्या नागपुरात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करत आहेत. आता त्यांच्याच नेतृत्वात राज्यातील इतरही जिल्ह्यात या घोटाळा प्रकरणात दाखल गुन्ह्याची चौकशी केली जाणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातून आतापर्यंत या घोटाळ्यात 24 अधिकारी आणि मुख्याध्यापकांना अटक करून प्राथमिक आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे. नागपूर पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथेही बनावट शालार्थ आयडी प्रकरणाशी संबंधित 3 गुन्हे दाखल आहेत. घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात असल्याने तपास पथकाची अधिकार कक्षा वाढवण्यास पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंजुरी दिली आहे.

राज्यासह देशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

पोलीस खात्यात शिपाई, प्रमोशन होऊन PSI झाला, 35 वर्षांनंतर झोल समोर आला अन्..., छत्रपती संभाजीनगरमध्ये काय झालं?

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget